Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Barshi Political Crime : बार्शीत बड्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला बेदम मारहाण; जरांगेंनी घेतली दखल

Manoj jarange Patil : बार्शीतील तरुणाला झालेल्या मारहाणीची दखल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 September : बार्शी शहरातील एका तरुणाला बड्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोलावून मारहाण केल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात आहे. संबंधित तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीची छायाचित्रे समाज माध्यमावर व्हायरल झाली आहेत.

संबंधित तरुण हा मराठा आरक्षण आंदोलनात काम करीत असल्याची माहिती आहे. मात्र, याची कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. संबंधित राजकीय नेत्याच्या दबावातूनच मारहाण झालेल्या तरुणाकडून पोलिसांत तक्रार केली नसल्याची कूजबूज आहे.

दरम्यान, बार्शीतील (Barshi) तरुणाला झालेल्या मारहाणीची दखल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी घेतली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. आता पोलिस प्रशासन काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनात काम करणाऱ्या संबंधित तरुणाने घेतलेली भूमिका न पटल्यामुळे बार्शीतील बड्या नेत्याच्या कार्यकर्त्यानी त्याला बोलावून मारहाण केल्याची चर्चा आहे. संबंधित तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीची छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मात्र, मारहाणीबाबत अजूनही पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना या गोष्टीची माहिती समजताच त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडत पोलिसांनी संबंधित प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जरांगे यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मला कळालं ते खरं आहे की खोटे? मला त्याची माहिती नाही. मी त्याची माहिती घेत आहे. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

मारहाण झालेला तो संबंधित तरुण, त्याची आई, बायको, लेकरं, बहीण यांच्या डोळ्यात पाणी आले असेल. त्यांच्या डोळ्यातील आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आम्ही हिशेब घेणार आहोत. तुमच्याही घरातल्या लोकांच्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित राजकीय नेत्याला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT