Manoj Jarange Vs Rajendra Raut : जरांगे अन्‌ माझा वाद, हे तर रोहित पवारांचे कटकारस्थान; राजेंद्र राऊतांचा दावा

Rohit Pawar : माझ्यापेक्षा सोपल बरे, असे ते चार ते पाच वेळा म्हणाल्यामुळे मला वेगळाच वास आला. सोपलांनी आम्हाला अनेक प्रकरणांत गुंतवण्याचा प्रयत्न केला. आता काय आमच्या लेकरांना गुंतवायचं आहे का?
Rajendra Raut-Rohit Pawar-Manoj Jarange Patil
Rajendra Raut-Rohit Pawar-Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 September : मनोज जरांगे पाटील यांचा सगळा सोशल मीडिया हा रोहित पवारांकडून चालवला जातो. जालना हे केंद्रबिंदू असून परभणी, हिंगोली बीडमधून चालू आहे. मलाही फोन केले जात आहेत, त्याला मी माझ्या स्टाईलने उत्तर दिलं आहे. मात्र, या कटकारस्थानामागे आमदार रोहित पवार असल्याचा संशय येतोय, असा आरोप आमदार राजेंद्र राऊत यांनी केला.

आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात संबंध असल्याचा आरोप केला आहे. आमदार राऊत म्हणाले, समाजाच्या नावावर नौटंकी चालू आहे. मी दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारा आहे. मी काही कच्चा खिलाडी नाही. बघतो करतो म्हणजे काय, आम्हाला गोळ्या घालणार असाल तर सांगा कुठे थांबू, या तुम्ही रिव्हॉल्व्हर घेऊन या. घाला गोळ्या आम्हाला, असे आव्हान राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांना दिले.

प्रश्न विचारल्यामुळे कोणी दादागिरी करत असेल तर सरकारने याकडे गांभीर्याने बघावं. मला फोन करून वेडंवाकडं बोललं जातं आहे, त्याला मीही त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. माझ्यावर ते किती वेळ बोलले. पण मी लक्ष दिलं नाही. आपल्या वादात आमच्या आई वडिलांना कशाला मध्ये आणता, असा सवालही राजेंद्र राऊतांनी जरांगेंना केला.

Rajendra Raut-Rohit Pawar-Manoj Jarange Patil
Rajendra Raut : माझं घरंबिर पेटविण्याचा जरांगे पाटलांचा विचार आहे काय..? आमदार राजेंद्र राऊतांचा सवाल

माझ्यापेक्षा सोपल बरे, असे ते चार ते पाच वेळा म्हणाल्यामुळे मला वेगळाच वास आला. बीडमध्ये घर पेटली तेव्हा त्यांच्या लेकरांचा कैवार नाही आला का..? सोपलांनी आम्हाला अनेक प्रकरणांत गुंतवण्याचा प्रयत्न केला. आता काय आमच्या लेकरांना गुंतवायचं आहे का. खोट्या नाट्या केसेस करायचं काही षडयंत्र आहे का, असा सवाल राऊतांनी केला.

मनोज जरांगे पाटील हे सार्वजनिक आहेत, हेकेखोरपणा करून चालणार नाही. त्यामुळे सार्वजनिक जीवनात आल्यावर प्रत्येकाचे समाधान करणं तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही करा. ती बार्शीतील मराठा समाजाची भूमिका आहे. बार्शीतील मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Rajendra Raut-Rohit Pawar-Manoj Jarange Patil
Barshi Agitation : मनोजदादा, तुम्ही महाराष्ट्राचे मालक झालात का ? बार्शीत जरांगेंविरोधात ठिय्या आंदोलन सुरू

राजेंद्र राऊत म्हणाले, माझी स्वतः ची कुणबी म्हणून नोंद आहे. माझ्या पणजोबांची बार्शी नगर पालिकेत कुणबी म्हणून नोंद आहे. आम्ही मूळ कोकणातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने आम्ही इकडे आलो आहोत. आजही आम्ही मराठवाड्यातील मराठा बांधवांचे स्वागत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com