सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुण उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिकेत (PMC) मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेने याआधी 448 आणि 320 पदांची भरती यशस्वीरीत्या पूर्ण केली होती. आता तिसऱ्या टप्प्यातील ही सर्वात मोठी भरती ठरली आहे.
पुणे महानगरपालिकेतील ही भरती महत्वाची ठरली आहे कारण यामध्ये मराठा आरक्षण (SEBC) सवलत लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा उमेदवारांसाठी ही संधी आणखी सोपी झाली आहे. तसेच, भरतीची प्रक्रिया आता IBPSच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांना सहजपणे अर्ज करता येणार आहे.
जानेवारी 2024 मध्ये या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, पण मराठा आरक्षणाचा विषय समोर आल्यामुळे ती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू होत आहे आणि काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यंदा एकूण 169 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
2024 ला निघालेली जाहिरात थांबवण्यात आल्याने त्या वेळेस अर्ज केलेल्या उमेदवारांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आता निघालेल्या जाहिरातीत वयोमर्यादेत सवलत देखील मिळाली आहे. 9 जानेवारी 2024ला जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्या आणि वयोमर्यादा ओलांडलेले 27,879 उमेदवारांना आता पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली आहे. राज्य शासनाने त्यांच्या वयोमर्यादेत सवलत दिली असून, त्यांना अर्ज सुधारण्याची आणि प्रवर्ग बदलण्याची संधी देखील मिळणार आहे.
नव्या अर्जांसाठी ऑनलाइन अर्ज 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मागवले जातील. अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा राज्यातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी आणि गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे दोन महिने चालणार आहे.
पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Civil Engineer) वर्ग- 3
पदसंख्या – 169 जागा
नोकरी ठिकाण – पुणे
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अधिकृत वेबसाईट – pmc.gov.in
अधिकृत जाहीरात - PDF
सरकारी नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या इंजिनिअर तरुणांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी वेळेत अर्ज करा, ही संधी गमावू नये.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.