Manoj Jarange Protest sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Protest : मुंबईला निघालेल्या मनोज जरांगेंना मोठा झटका, पोलिसांनी परवानगी नाकारली

Police Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच न्यायदेवता आपल्या बाजुने असल्याचे सांगत परवानगी दिली नाही तरी आपण आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

Roshan More

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील हे 15 सप्टेंबरला मुंबईकडे निघणार आहेत. मात्र, मुंबईकडे कूच करण्याच्याआधीच पोलिसांनी त्यांना मोठा झटका दिली आहे. आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जरांगे पाटील यांच्याकडून पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी आंदोलनास परवानगी नाकारली आहे.

आंदोलनामुळे दक्षिण मुंबई परिसरातील सामान्य व्यवहार जरे शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यापालिका, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक आरोग्य बाधीत होऊन सार्वजनिक सुव्यव्यस्थेचा गंभीर होणार असल्याचे सांगत जरांगे पाटील यांना पोलिसांनी परवानगी नाकराली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच न्यायदेवता आपल्या बाजुने असल्याचे सांगत परवानगी दिली नाही तरी आपण आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विनापरवानगी आंदोलनासाठी जरागे पाटील मुंबईत आंदोलनासाठी आले तर प्रशासन त्यांच्यावर कारवाई काय करणार याची देखील चर्चा सुरू आहे.

सरकराकडून हालचाली

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई न येता त्यांची आधी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केली आहे. जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे म्हणत आहेत.

मनोज जरागेंच्या मागण्या

1) निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदी त्या नोंदीची कुणबी प्रमाणपत्र सर्वाच्या सर्व तात्काळ वाटप कराव...

2) हैदराबाद गॅझिटिअरचा फक्त जीआर काढण्यात आलाय. गॅझिटिअरमध्ये असलेल्या संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यातच आले नाहीत कुणबी नोंदीच्या संख्येनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावं आणि याची व्हॅलिडीटी कशी देणार हे पण लगेच स्पष्ट कराव...

3) सातारा संस्थान गॅझेटटियर, कोल्हापूर संस्थान गॅझेटटियर, औंध -पुणे -बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटटियर तात्काळ जीआर काढून लगेचच अंमलबजावणी करावी...

4) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावीत, अंतरवाली सराटीतील गुन्हे मागे घ्यावे.

5) मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय मराठा समाजासाठी लगेच स्थापन करावे.

6) ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेत त्यांना आजची आज कुणबी प्रमाणपत्र द्यावं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत त्यांना लगेचच व्हॅलिडिटी द्यावी.

7) मराठा समाजाला ही ओबीसींच्या सर्व सवलती सोयी सुविधा देण्याचा जो जीआर काढण्यात आला त्या जीआरची अंमलबजावणी करावी.

8) सारथीच्या सर्व योजना सुरू करण्यात याव्यात पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तात्काळ द्यावे होस्टेलच्या सुविधा पण द्या...

9) मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना तात्काळ नोकरी द्यावी आर्थिक निधी लगेच द्यावा.

10) शिंदे समितीला पुन्हा कुणबी नोंदणी शोधण्यासाठी आजपासूनच रेकॉर्ड तपासण्याचे सांगावे.

11) EWS/SEBC/ESBC मधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना आजचे आज नियुक्त द्याव्या.

12) मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत वाहने दिली त्यातूनच व्याज परतावा सरकारने दिले नाहीत.त्या व्याज परताव्याची सपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी.

13) सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT