Ahilyanagar News: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान,आता अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे.
राहुरी पोटनिवडणुकीपासूनच प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनवर पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तनपुरे हे भाजपच्या जवळ गेल्याची जोरदार चर्चा रंगू लागली होती.
विधानपरिषद निवडणुकीत अहिल्यानगरच्या जागेसाठी महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच प्राजक्त तनपुरे यांचा भाजपप्रवेश जवळपास शिक्कामोर्तब झाल्यातच जमा असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपकडून येत्या दोन ते तीन दिवसांत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याचदरम्यान, मंगळवारी (ता.26)सायंकाळी तनपुरे यांनी त्यांचे मामा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हात जोडलेला फोटो पोस्ट केल्याचं समोर आल्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.
राहुरी पोटनिवडणुकीनंतर राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप भाजपच्या व्यासपीठावर कोठेही थेट हजेरी लावलेली नाही.मात्र, त्यांनी राहुरी पोटनिवडणुकीत घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी जाहीर कौतुक केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.