BJP Maharashtra : विधान परिषदेसाठी भाजपची मोठी खेळी; 48 उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष चव्हाण दिल्लीत; दोन दिवसांत होणार घोषणा?

MahaYuti seat sharing News : भाजप निवडणूक लढविणाऱ्या 12 मतदारसंघातील प्रत्येकी 4 या प्रमाणे एकूण 48 उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत.
Devendra fadnavis, ravindra chavan
Devendra fadnavis, ravindra chavan Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला असून 17 जागेसाठी 18 जूनला निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात झाल्यानंतर महायुतीमधील जागावाटपाची बोलणी सुरूच आहे. 17 जागांपैकी 12 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी भाजपने केली आहे. एकीकडे शिंदेंची शिवसेना सहा जागा मिळण्यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे मात्र भाजपने शिंदे सेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून पाच जागा सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचे पुढे आले आहे. भाजप निवडणूक लढविणाऱ्या 12 मतदारसंघातील प्रत्येकी 4 या प्रमाणे एकूण 48 उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंगळवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. पुढील 2 ते 3 दिवसांत दिल्लीत भाजपच्या हायकमांडकडून उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असून त्यानंतर फायनल उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे.

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने येत्या काळात पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापणार आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली असून या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे महायुतीच्या तीन पक्षात जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच दिसत आहे. या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला भाजप 12, शिंदेंची शिवसेना (Shivsena) 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा असा ठरला असल्याची चर्चा आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Maharashtra News Live Update : मोठी बातमी: 18 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावी निकाल शनिवारी जाहीर होणार

यासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसून तीन पक्षाचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना सहा जागा मिळण्यासाठी आग्रही आहे. त्यासाठी दोन दिवसापूर्वी शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. शिंदे यांची मनधरणी करण्याची जबाबदारी भाजपकडून रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र, भाजपने (BJP) 12 जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारांच्या नावांची यादीही निश्चित केल्याची माहिती आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपात हालचालींना वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंगळवारी रात्री 48 नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होत आहेत. त्यामुळे भाजप जवळपास 12 जागा लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यासाठी, विधान परिषदेच्या एकूण 12 जागांसाठी 48 जणांच्या नावांची यादी घेऊन चव्हाण दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चव्हाण नावांसंदर्भात चर्चा करणार असल्याचे समजते.

Devendra fadnavis, ravindra chavan
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

दिल्लीतून होणार उमेदवारांची घोषणा

विधानपरिषद निवडणुकांचा महायुतीमधील फॉर्म्युला, भाजपच्या उमेदवारांची नावे याबाबतची विस्तृत माहिती केंद्रीय पक्ष नेतृत्वाला दिली जाणार आहे. त्यानंतर यावेळी भाजपच्या 12 उमेदवरांची नावे निश्चित केली जाणार असून पुढील 2 ते 3 दिवसांत भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 1 जून पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे लवकरच उमेदवारांची घोषणा दिल्लीतूनच होणार आहे.

Devendra fadnavis, ravindra chavan
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com