Prakash Ambedkar News  Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar News : भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या पंकजाताईंना आंबेडकरांचा सल्ला

Mangesh Mahale

Beed : पंकजा मुंडे (Prakash Ambedkar) भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पंकजाताईंना (Pankaja Munde) अनेक पक्षांतून ऑफर आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) त्यांना बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. आंबेडकर बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

"पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. भाजप बहुजन विचारसरणीचा नाही. पंकजाताईंना त्यांची विचारसरणी मान्य आहे, असे दिसते. जर पंकजा मुंडेंना बहुजनांचा नेता व्हायचं असेल तर आधी त्यांना त्या पक्षातून बाहेर यावे लागेल, मग मला त्यांच्याविषयी बोलता येईल. त्यांना काही सल्ला द्यायचा असेल तर तो त्यांना वैयक्तिक देईल, जाहीररित्या सल्ला कसा देऊ, असे आंबेडकर म्हणाले. "पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या असतील, तर बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढतील," असे ते म्हणाले.

"राज्य सरकार पूर्णपणे गोंधळलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा एक आदेश तर उपमुख्यमंत्र्यांचा वेगळा आदेश असतो. विरोधकांवर भाजपने धाडी घालायला नव्याने सुरुवात केली आहे. मणिपूर, गुजरातमध्ये जे घडले ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे, अशी भीती आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

"पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) एकत्र लढत आहेत असे सांगतात. आघाडी सरकार जाऊन वर्ष झाले तरी यांच्यात जागावाटपाचे ठरले नाही. सरकारमध्ये जे सुरू आहे, तेच राजकारणात चालले आहे," असे आंबेडकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT