Dasara Melava 2023 News : ठाकरे, शिंदे, मुंडे, पवारांसह यंदा धनगर समाजही घेणार दसरा मेळावा

Dhangar Reservation News : चौंडी येथे धनगर आरक्षण दसरा मेळाव्याचे आयोजन यशवंत सेनेकडून करण्यात आले आहे.
Dhangar Reservation News
Dhangar Reservation News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेनेचे दोन्ही गट (ठाकरे गट, शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असताना यंदा यात धनगर समाजाच्या दसऱ्या मेळाव्याची भर पडणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करा, या मागणीसाठी दसऱ्याला नगरच्या चौंडी येथे धनगर आरक्षण दसरा मेळाव्याचे आयोजन यशवंत सेनेकडून करण्यात आले आहे.

आरक्षणासाठी धनगर समाजाने 21 दिवसांचे आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारला 50 दिवसांचा वेळ दिला आहे. मात्र, सरकारवर दबाव आणण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचं यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताले यांनी सांगितले. चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचा दर्शन घेऊन दोलताले यांनी घोषणा केली आहे.

Dhangar Reservation News
Vijay Wadettiwar News : जनरल मोटर्स बंद करण्यासाठी खाडेंना किती मलिदा मिळाला ? वडेट्टीवारांचा सवाल

आरक्षण देण्याबाबत काम करीत असलेल्या सरकारला जनशक्तीच्या माध्यमातून संदेश देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक दिवस समाजासाठी खर्च करून मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन दोलताले यांनी केले आहे.

धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आम्हाला भेटण्याची वेळ द्यावी, अशी विनंती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताले यांनी केली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी चौंडी येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रतिसाद देत सरकारने 50 दिवसांची वेळ मागितली आहे. मात्र, या मागणीला विरोध करत आदिवासी समाजदेखील आक्रमक झाला आहे.

आदिवासींच्या काही आमदारांचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या भेटीला गेले. राष्ट्रपतींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. मात्र, आम्ही पत्रव्यवहार करूनही आम्हाला वेळ मिळत नाही, राष्ट्रपतींनी आम्हालाही वेळ द्यायला हवा आहे, असे दोलताले यांनी म्हटलं आहे.

मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाकडून मेळावे घेण्यात आले येणार आहेत. याच दिवशी बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यादेखील मेळावा घेणार आहेत. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही जाहीर सभा होणार आहे.

Dhangar Reservation News
Yashomati Thakur News : आडनावावरून राजकारण पेटलं; ठाकूर बोंडेंना फटकारत म्हणाल्या, "बोंडेंच्या बोंडअळ्या..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com