Prakash Ambedkar Devendra Fadnavis Sambhaji bhide sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'संभाजी भिडेला आत टाकलं नाही, 'ती' चूक पुन्हा करू नका', देवेंद्र फडणवीसांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

Prakash Ambedkar Advises Devendra Fadnavis : द निमित्त गरीब मुस्लिम कुटुंबांना सरकारकडून सौगात ए मोदी हे कीट देण्यात येत आहे. मात्र, ही मदत राजकीय हेतुने केली जात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Roshan More

Prakash Ambedkar News : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यावरून सध्या वाद पेटला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून समाधी हटवण्याची मागणी केली आहे. तर, संभाजी भिडे यांनी संभाजीराजेंची भूमिका चुकीची असून वाघ्या कुत्रा होता. त्याची समाधी हटवण्यास विरोध दर्शवला.संभाजी भिडेंच्या भूमिकेविषयी वंचित बहुज आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना विचारले .

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मी याच्यावर बोलणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे की तुम्ही आज मुख्यमंत्री आहात. तुम्ही अटल बिहार वाजपेय यांना आठवा. त्यांनी असं म्हटलं आहे की जो कोणी राजदंड हातात घेतो त्याला राज्य चालवता आलंच पाहिजे. जो कोणी कायद्याला मानत नसेल त्याला आतमधी टाकता आलं पाहिजे.'

'देवेंद्र फडणवीस यांनी भिमा कोरेगावच्या वेळेस आतमध्ये टाकलं नाही. बळ दिलं. ती चूक पुन्हा करू नका हीच माझी अपेक्षा आहे.', असे म्हणत संभाजी भिडेला बळ न देण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला.

सौगात ए मोदीवर टीका

ईद निमित्त गरीब मुस्लिम कुटुंबांना सरकारकडून सौगात ए मोदी हे कीट देण्यात येत आहे. या कीटमध्ये शेवया, खजुर, सुकामेवा, साखर, डाळ, बेसन, तेल हे साहित्य आहे. मात्र सौगात ए मोदी हे राजकीय हेतुने दिले असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. २२ टक्के हिंदू सरकारच्या विरोधात गेले असतील तर आपल्याला दुसरा मतदार पाहिजे म्हणून मुस्लिमांचे लांगुनचालन सुरू असलेले आम्ही बाहेर आणले आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT