Narendra Modi Nagpur visit : "...अन्यथा काळे झेंडे दाखवू"; PM मोदींच्या नागपूर दौऱ्याआधीच विदर्भवाद्यांचा इशारा

Modi RSS headquarters visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरला येत आहेत. या दौऱ्यात ते विदर्भाला काय भेट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधानांना आपल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे.
Narendra Modi Nagpur visit
Narendra Modi Nagpur visitSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 27 Mar : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूरला (Nagpur) येत आहेत. या दौऱ्यात ते विदर्भाला काय भेट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधानांना आपल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी नागपूरच्या दौऱ्यात विदर्भवाद्यांनी मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आपल्या दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देणार आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी हे तब्बल दहा वर्षानंतर संघ मुख्यालयात येणार आहेत.

यासोबतच मोदी बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीवर जाणार आहेत. माधव नेत्रालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी ते नागपूरला येत आहेत. मोदी यांनी आमच्याही मागणीकडे लक्ष द्यावे आणि चर्चा करावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयत आणि नागपूर विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून आपला निरोप त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी निवेदन दिले आहे.

Narendra Modi Nagpur visit
Job Placement Agency Rules : नोकरीच्या नावाखाली तरूणांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महायुती सरकारने उचललं मोठं पाऊल, 'हे' विधेयक केलं मंजूर

पंतप्रधानांनी भेट नाकारल्यास त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार असल्याचा इशाराही समितीचे अध्यक्ष अरुण केदार, अहमद कादर, सुनील चोखारे, मुकेश मासुरकर, नरेश निमजे, प्रशांत नखाते, ज्योती खांडेकर, गणेश शर्मा, राजेन्द्र सतई, भोजराज सरोदे यांनी दिला आहे.

केंद्रात आणि राज्यात विरोधात असताना भाजपचे (BJP) नेते आणि कार्यकर्ते विदर्भवादी होते. अनेक आंदोलने भाजपने केली आहेत. भाजप छोट्या राज्यांच्या बाजूने राहिली आहे. अटलबिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना तीन नव्या राज्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

Narendra Modi Nagpur visit
Waghya statue : 'औरंजेबच्या कबरीपासून वाघ्या कुत्र्याच्या समाधीपर्यंत, फक्त जातीय वळण...'; होळकरांच्या वंशजानं फटकारलं

याउलट कुठलीही मागणी नसताना मध्य प्रदेशातून छत्तीसगड वेगळे काढून स्वतंत्र राज्य करण्यात आले. केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. दहा वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी शपथपत्र भरून दिले होते.

त्यानंतर केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता आली. मात्र भाजपच्या नेत्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचा आरोप विदर्भवाद्यांचा आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा तेंगलणासोबतच विदर्भाचा विचार केला जाईल असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांना दिले होते हे विशेष.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com