Prakash Ambedkar  sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : 'आरएसएसला रोखायचे असेल तर मुफ्ती, मौलवींनी...', प्रकाश आंबेडकरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Prakash Ambedkar RSS-BJP : औंरगजेबाचा मुद्दा असो किंवा हिजाबचा मुद्दा या दोन्ही प्रसंगी एक तरी नगरसेवक मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

Roshan More

Prakash Ambedkar News : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मौलवी,मुफ्ती आणि मुस्लिम संघटनांना आवाहन केले. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत मौलवी, मुफ्ती आणि मुस्लिम संघटन जे मुस्लिमांच्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने उभे राहिले पाहिजे. ते ही भूमिका ते का घेत नाहीत.

मुफ्ती, मौलवींनी मित्र जोडायला शिकावे तेव्हाच आरएसएस आणि भाजपला तोंड देऊ शकाल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, औरंगजेबाचा प्रश्न असो किंवा हिजाबचा मुद्दा या दोन्ही प्रसंगी एक तरी नगरसेवक मुस्लिमांच्या बाजूने ठामपणे उभा राहिला का? मुस्लिम नगरसेवकांनी मोर्चे काढले का? उत्तर प्रदेशात मुस्लिमांच्या घरांवर बुलडोझर चालवले गेले, तेव्हा त्याविरोधात एकही मुस्लिम नगरसेवक औरंगाबाद मध्ये रस्त्यावर उतरला का? असा सवाल देखील त्यांनी केले

'बदलापूर' प्रकरणावरून भाजपवर टीका

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले आहे. असा व्यक्ती आरएसएस व भाजप कार्यकर्त्यांच्या घरी येईल. यामुळे आरएसएस आणि भाजपचे कार्यकर्तेही असुरक्षित झाले आहेत. अशी  टीका त्यांनी केली.

मोदींच्या धोरणांमुळे देश संकटात

नरेंद्र मोदी आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाचा थेट परिणाम देशातील सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय मंचावर मोदी सरकारमुळे देशाची झालेली दुरावस्था झाली आहे असे म्हणत मोदींना धडा शिकवायचा असेल तर भाजपला मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT