

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना आज प्रचाराचा सुपर संडे ठरत आहे. सर्वच राजकीय पक्ष सर्व तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. शहरातील प्रत्येक मतदारसंघात रॅली बैठका सभांचा धडाका सुरू असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी थेट खासदार धनंजय महाडिक यांच्या घरासमोरच करारीपणा दाखवला.
काँग्रेसचे (Congress) नेते आमदार सतेज पाटील यांनी रुईकर कॉलनी येथे 'मिसळ पे चर्चा' कार्यक्रम घेत असताना महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. सातत्याने पक्ष बदलण्यावर देखील काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी टीका केली. यावेळी टीका करत असताना बंटी पाटील मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहिला, अशी ओळ माझ्या नावाने लिहिली तर बस झाले, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर महापलिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्याने रणधुमाळी जोरात सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या कारभारावर टीका करताना सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, 'जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार असताना प्रामाणिक कार्यकर्ता तयार करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. महापालिकेची कुस्ती आपणच मारणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सतेज पाटलांचा टोमणा
मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही, अशा शब्दांत खासदार महाडिक यांच्यावर सतेज पाटील यांनी तोफ डागली. महापालिका निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला असतानाच सतेज पाटलांनी मारलेल्या टोमण्याची चर्चा रंगली आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी रुईकर कॉलनी येथून कृष्णराज महाडिक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षाने काढलेल्या आदेशानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली. तोच धागा पकडत सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.