Prakash Ambedkar, Sushma Andhare sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare News : प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंचा 'स्ट्राईक रेट' काढला; सुषमा अंधारेंचाही 'स्ट्रेट ड्राइव्ह', म्हणाल्या,...

Political News : त्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले. आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्ट्राईक रेटवरून शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो, अशी टीका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावर केली होती. त्या टीकेनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले. आंबेडकर यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) जर स्ट्राईक रेटवरून बोलत असतील तर सातत्याने केंद्रात मंत्री असलेले रामदास आठवले हेच आरपीआय चळवळीचे एकमेव नेतृत्व आहे, असा चिमटा काढत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. (Sushma Andhare News)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. एका सभेत बोलताना त्यांना ओबीसी आरक्षणाला 100 टक्के धोका असल्याचे म्हटले होते. कुणबी मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नये, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना पक्षावरही विधान केले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर समजेल की एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळसरळ दुप्पट आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की शिवसेनेची मते एकनाथ शिंदे यांच्याकडे राहिली आहेत. आता शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरी शिवसेना मानतो आहे. उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लीम यांच्यामुळे वाढला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

आंबेडकर यांनी केलेल्या या टीकेनंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक टीका करीत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. स्ट्राईक रेटसारखे शब्द वापरून शिवसेना पक्षाची मालकी कुणाची हे ठरत असेल तर मग रिपाई चळवळीचा एकमेव माणूस सातत्याने खासदार आणि मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीच्या राजकारणात आहे. याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या वंचित उपेक्षितांचे नेतृत्व फक्त आणि फक्त रामदास आठवले करू शकतात, असाच होतो, असे ट्विट करीत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करीत खोचक टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT