Sujay Ambedkar Prakash Ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Sujat Ambedkar : प्रकाश आंबेडकर रुग्णालयात, पुत्र सुजात यांनी 'वंचित'च्या उमेदवारांना दिला खास संदेश

Prakash Ambedkar Health Update: प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Roshan More

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकाश आंबेडकर रुग्णालयात असताना त्यांचे पुत्र सुजय आंबेडकर यांनी वंचितच्या उमेदवारांना खास संदेश दिला आहे.

सुजय आंबेडकर म्हणाले की, माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापले मतदारसंघ सांभाळा. ते सोडू नका. आम्ही सर्व बाळासाहेबांच्या (प्रकाश आंबेडकर) सोबत आहोत.

काल (बुधवारी) रात्री प्रकाश आंबेडकरांच्या छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर कळवतील तसे आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल, असे देखील सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी

प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज (गुरुवारी) अँजिओग्राफी झाली. उजव्या कोरोनरी धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.उद्या (शुक्रवारी) प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी होणार आहे.

वंचित स्वबळावर

वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये सरळ लढत होत असताना वंचितच्या स्वबळाच्या नाऱ्याने या विधानसभा निवडणुकीत वंचित निर्णायक भूमिका पार पाडू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT