Prakash Ambedkar
Prakash Ambedkar  sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar VBA : विधानसभेसाठी 'वंचित'चा प्लॅन ठरला! युती की आघाडी...

Roshan More

VBA News : वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. वंचितच्या मतांची टक्केवारी देखील घसरली आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची तयारी वंचितने आत्तापासूनच सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने मोठा निर्णय घेतला आहे.

सरसकट उमेदवार देण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, अशा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा वंचितचा प्लॅन असणार आहे.

लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची बैठक नुकतीच लोणावळा येथे पार पाडली. या बैठकीला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar उपस्थित होते.

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल चर्चा झाली. तसेच वंचित बहुजन आघाडीची राज्यातील ज्या विधानसभा मतदारसंघात ताकद आहे, असे मतदारसंघ निवडून त्याठिकाणी शक्ती केंद्रित करून लढावे असा निर्णय बैठकीत झाला.

लोकसभेत मोठा फटका

यंदा लोकसभा निवडणुकीत वंचितने VBA 37 मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, एक दोन जागा वगळता सर्वच ठिकाणी वंचितच्या उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले. 2019 मध्ये तब्बल सात टक्के मते घेणारी वंचित यंदा साडेतीन टक्क्यांच्या जवळ आली.

विधानसभेला एकला चलो रे?

लोकसभेच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवर देखील टीका केली होती. सध्या प्रकाश आंबेडकर हे भाजप आणि काँग्रेसपासून देखील अंतर राखून आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपसोबत न जाता लोकसभेप्रमाणे वंचित निवडणूक निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाशी युती?

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची युती होण्याबाबतचे वक्तव्य केले होते. मात्र,जोपर्यंत अजित पवार गट भाजपची साथ सोडत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत युतीचा विचार देखील करणार नसल्याचे वंचितकडून स्पष्ट करण्यात आले होते. अजित पवार गट हा विधानसभेला भाजपसोबत महायुतीमध्येच राहण्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे वंचित आणि अजित पवार गटाच्या युतीची शक्यता देखील कमीच आहे, असे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT