VBA News : 'वंचित'च्या पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Kalyan News : वंचितच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजातून मारहाण केल्याचे सांगितले जात आहे . या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.
Milind Kamble
Milind Kamble sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने उतरली आहे. मुंबईतील सर्वच जागांवर वंचितने आपला उमेदवार उभे केले आहेत. मात्र, भिवंडीमध्ये ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याच्या नावाशी साधर्म्य असलेल्या दुसऱ्याच व्यक्तीने पक्षाच्या एबी फाॅर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिडलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी ज्याला उमेदवारी देण्यात आली होती त्याच उमेदवाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर Social Media व्हायरल झाला आहे.

कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला वंचितच्याच कार्यकर्त्यांनी भररस्त्यात अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. पक्षाची दिशाभूल केल्याच्या गैरसमजुतीतून वंचितच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचे सांगितले जात आहे . या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही.

Milind Kamble
Tatkare-Pawar News : तटकरे, पवार भेटीबाबत उमेश पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, हा तर योगायोग....

कल्याण पश्चिमेकडील रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या वंचितचे पदाधिकारी मिलिंद कांबळे यांना वंचितने भिवंडी लोकसभा Bhiwandi lok sabha मतदारसंघातून उमेदवारी देत एबी फॉर्म दिला होता. हा फॉर्म देण्याची जबाबदारी एका व्यक्तीला देण्यात आली. त्याचे नाव देखील मिलिंद कांबळे होते. मात्र नावात साम्य असल्याचा फायदा घेत ज्या मिलिंद कांबळेकडे फाॅर्म दिला होता. त्याने फॉर्म चोरून अर्ज दाखल केला. एबी फॉर्म चोरून फॉर्म भरणाऱ्या मिलिंद कांबळेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी भिवंडी पोलिसांचा तपास सुरू आहे .

मात्र, ज्याने अर्ज भरला त्याच्यासोबत ज्यांनी उमेदवारी दिली होती ते कल्याणमधील वंचितचे VBA पदाधिकारी मिलिंद कांबळे देखील सामील असल्याचा संशय वंचितच्या कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे त्यांनी कल्याण रोनक सिटीमध्ये राहणाऱ्या मिलिंद कांबळे याना गाठत जाब विचारला. त्यावेळी मिलिंद कांबळे यांनी आपल्यासोबत कशी फसवणूक झाली दुसऱ्या मिलिंद कांबळेने कसे फसवले, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वंचितच्या कार्यकर्त्याने तुम्ही देखील सहभागी आहात असे सांगत त्यांना मारहाण केली .अक्षरशः भर रस्त्यात कपडे फाटे पर्यंत मारहाण करण्यात आली. गैरसमजुतीतुन ही मारहाण करण्यात आली, हा प्रकार वरिष्ठांना सांगितला असल्याचे वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Milind Kamble
Neelam Gorhe News : नीलम गोऱ्हे यांची विरोधकांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष सहमती; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com