CM Pramod Sawant sarkarnama
महाराष्ट्र

Pramod Sawant Video : निवडणूक अधिकाऱ्यांकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बॅगांची तपासणी; व्हिडिओ आला समोर

Goa CM Pramod Sawant Bags Checked by Election Commission: महायुतीच्या प्रचारासाठी गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात प्रचार करत आहे. यावेळी सातारा जिल्हातील कराड विमानतळावर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.

Rashmi Mane

Karad News: राज्यात विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणा चांगलीच 'अलर्ट मोड' वर आहे. राज्याच्या विविध भागात नेते मंडळी प्रचारासाठी हजेरी लावत आहेत. त्यातच आज महायुतीच्या प्रचारासाठी गोव्यातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह नेते मंडळी महाराष्ट्रात प्रचार करत आहे. यावेळी सातारा जिल्हातील कराड विमानतळावर त्यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.

कराड दक्षिण उमेदवार मनोज घोरपडे आणि कराड उत्तरचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ प्रमोद सावंत यांनी सभेसाठी हजेरी लावली. प्रमोद सावंत कराड विमानतळावर दाखल होताच त्यांच्यासोबत असलेल्या बॅगची तपासणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. सावंत यांच्या बॅगची तपासणी करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कराडमध्ये सभा घेण्यापूर्वी सावंत यांनी सांगलीत दोन सभांना संबोधित केले.

बॅग तपसाणीवर महाराष्ट्रात वाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बॅग काही दिवसांपूर्वी वणी आणि औसा येथे तपासण्यात आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटलं. उद्धव ठाकरेंनी या घटनेचा व्हिडीओ स्वत: शुट केला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 'माझ्यासह मिंधे, मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचीही बॅग तपासणी केल्याचे व्हिडिओ मला पाठवा,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

खासदार अमोल कोल्हे यांची देखील बॅग काही दिवसांपूर्वी तपासण्यात आली. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निवडणूक अधिकारी देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT