Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बनंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण तापले आहे. जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बनंतर शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट भाजपकडे बोट दाखविले आहे. त्यामुळे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कदम यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार पलटवार करीत त्यांच्या विधानातील हवाच काढली.
या सर्व प्रकाराला भाजप जबाबदार, भाजपचे षडयंत्र असे बोलणे चुकीचे आहे. भाजपवर केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही. जरांगे यांच्या आंदोलनाला आतापर्यंत खतपाणी कोणी घातले असा आरोप करीत आमच्याकडे एक बोट दाखवले तर चार बोटे तुमच्याकडे आहेत, असे म्हणत दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
भाजपला (BJP) दोष देणे योग्य नाही, ते खपवून घेणार नाही. आपण सत्तेत एकत्र असताना अशी वक्तव्ये टाळायला हवीत. आमच्या नेत्यावर टीका झाल्यावर आम्हीही थेट टीका करणार. देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का?, असे प्रत्युत्तर दरेकरांनी दिले. भाजपला दोष देणे योग्य नाही, ते खपवून घेणार नाही. आपण सत्तेत एकत्र असताना अशी वक्तव्ये टाळायला हवीत. आमच्या नेत्यावर टीका झाल्यावर आम्हीही थेट टीका करणार, असे प्रत्युत्तर दरेकरांनी दिले आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. रामदासभाई, जरा धीरानं आणि संयमाने घ्या. तुम्हाला काय मिळावयचं ते मिळावा, पण भाजपला आरोपी करू नका. आम्ही काहीही ऐकून घेऊन, हा त्यांचा भ्रम आहे. मतभेद असतील तर ते चार भिंतींच्या आत सोडविता येतील. सुपारीबाज कोण, रामदासभाईंचा इतिहास जगाला माहिती आहे, अशी जोरदार पलटवार दरेकर यांनी केला आहे.
सत्तेत राहून मित्रपक्षावर आरोप करणे अयोग्य आहे. रामदासभाई धीराने व संयमाने घ्या. काहीही बोलले तरी आम्ही ऐकून घेणार नाही. महायुतीमधील सहकारी पक्षावर टीका करणे योग्य नाही. चौकशी होण्याआधीच भाजपवर षडयंत्रांचे आरोप कसे काय करीत आहेत. आतापर्यंत जरांगे तुम्हाला चांगले वाटत होते. तुम्ही अरे केलात तर आम्ही कारे करू, असा इशारा यावेळी दरकार यांनी दिला.
सुपारीबाज कोण आहे ते सगळ्या जगाला माहित आहे. भाजपनेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे महायुतीवर टीका करणे अयोग्य आहे. रामदास कदम यांची ही भूमिका व्यक्तिगत असावी. मतभेद असतील तर चार भिंतींच्या आड मिटण्यास हवेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे विनाकारण वाद वाढेल असे वक्तव्य टाळावे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.