NCP new president selection : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून बराच राजकीय धुरळा उडाला आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, यावर वेगवेगळ्या चर्चा होत असताना, प्रफुल्ल पटले यांचे नाव आघाडीवर आहे.
पण पटेलांच्या हाती मराठमोळा राष्ट्रवादी पक्ष जाऊ नये यावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. पण यातच आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाध्यक्षाबाबत मोठा दावा केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रवादी पक्षातील प्रत्येक आमदार, खासदार आणि कार्यकर्त्याची एकच इच्छा आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फक्त सुनेत्रा अजितदादा पवार (Ajit Pawar) असतील. अन्य दुसरं कुणी नसणार."
'सुनेत्रावहिनींची विधिमंडळातील गटनेता पदाच्या निवडीवेळी सर्व आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. त्याच वेळी दुसऱ्या पत्रावरही सह्या केल्या होत्या. ते दुसरं सह्या केलेले पत्र, राष्ट्रवादीच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रावहिनी असाव्यात, असे ते होते. ही सर्व आमदारांची भावना होती. कारण, अजितदादांचा पुढचा वारसा सुनेत्रावहिनी शिवाय अन्य कुणी नाही,' असे मत मिटकरींनी व्यक्त केलं.
अमोल मिटकरी यांनी, बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत देखील मोठा दावा केला आहे. पक्षातील वरिष्ठ नेते विधिमंडळातील नेते आणि मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चाअंती निर्णय होईल. दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दादांकडे होते, त्याचप्रमाणे सुनेत्रा वहिनीकडे असावे, हिच आमची भावना आहे. परंतु शेवटी अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असे सांगितले.
संजय राऊत यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत माहिती देताना घेतलेली आक्रमक भूमिकेवर, अमोल मिटकरी यांनी, राऊतांनी सुरुवातीला संवेदशीलता दाखवली, मात्र त्यानंतर तो विषय राजकारणाकडे वळवला. कालची सुरुवातची पत्रकार परिषद अगदी व्यवस्थित होती. मात्र पुढे ते बोलले अजितदादा भाजपने केलेल्या घोटाळ्याची फाईल घेऊनच बारामतीत जात होते. याला काहीचं अर्थ नाही, असे मिटकरी यांनी म्हटले.
'संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करू नये. आम्ही अजूनही शोकात आहोत. त्यामुळे तुमचं राजकारण, आम्ही शोकात असताना, भावनांना डिवचल्यासारखं होत आहे. त्यामुळे त्यांनी थोड्या काळ अशाप्रकारेचं राजकारण थांबवावे,' असे आवाहन देखील अमोल मिटकरी यांनी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.