Gopichand Padalkar : आमच्या नादाला लागण्याआधी.., मग उदबत्ती पेटवा..; 'बाजार बुनग्यांना' इशारा देणारं गोपीचंद पडळकरांचं नवीन गाणं

Gopichand Padalkar Holkarshahi Song Goes Viral in Sangli : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे होळकरशाहीवर धडाकेबाज गाणे तुफान व्हायरल होत आहे.
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

political song Maharashtra : भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चेत असतात. आता त्यांचे नवीन गाणं होळकरशाहीनं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आमदार पडळकर यांनी या गाण्यातून ज्यांना द्यायचा, तो सूचक पण तेवढाच धडाकेबाज इशारा दिला आहे.

'आमच्या नादाला लागण्याआधी.., एकदा होळकरशाही आठवा.., मग उदबत्ती पेटवा..,' या कडक बोलानं राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. आमदार पडळकर यांचे हे गाण यु-ट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राजकीय वाटचाल वंचित बहुजन आघाडीतून झाली. आता ते भाजपमध्ये चांगलेच स्थिरावले आहे. भाजपची मुलूख मैदान तोफ म्हणून, त्यांची ओळख आहे. राज्यात सत्ताधारी पक्षात असून, ते विरोधकांना अंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानसभा परिसरात झालेला, राडा अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे.

भाजपमध्ये (BJP) असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांना अभिनयाचा छंद आहे. त्यामुळे त्यांची अभियनाचा छंद जपत, नेता, अभिनेता ते नेता, असा त्यांचा प्रवास अजूनही दिसतो. गोपीचंद पडळकर आता या गाण्याच्या माध्यमातून एका वेगळ्या रुपात लोकांसमोर आले असून, त्यांचं एक जबरदस्त गाणं चर्चेत आलं आहे. 2 फेब्रुवारीला त्याचं नवं गाणं यु-ट्यूबवर प्रदर्शित झालं आहे.

Gopichand Padalkar
Lawyers Boycott Court Work : कोर्ट आहे की बाजार? न्यायाधीशांच्या वर्तनावर वकिलांचा संताप, आंदोलनाची ठिणगी पेटली

गोपीचंद पडळकरांच्या सध्या सोशल मीडियावर गाण्याची चर्चा रंगली आहे. गाणं रिलीज झाल्यापासून अवघ्या 24 तासांत या गाण्याला दीड ते दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. पडळकरांच्या गाण्यावर कमेंट करुन कार्यकर्त्यांनी कौतुक केलं आहे.

Gopichand Padalkar
NCP Merger : विलीनीकरणाचा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घ्यावं लागेल, छगन भुजबळांच्या विधानामागचं नेमकं राजकारण काय?

राजकीय वाटचाल...

गोपीचंद पडळकर हे भाजपमधून धनगर समाजाचे नेते समोर येत आहेत. धनगर आरक्षण, धनगर समाजाशी निगडीत असलेले आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर करतात. लोकसभा निवडणुकांच्या वेळी, त्यांनी भाजपला राम-राम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता.

भाजप-वंचित-भाजप असा राजकीय प्रवास

'वंचित'कडून लढताना लोकसभेत पराभव झाला. गोपीचंद पडळकर यांनी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकत भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती, मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com