Pune Firing Sarkarnama
महाराष्ट्र

Pune Firing Video : कोथरूड गोळीबार प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा, 'अवघ्या 15 मिनिटांमध्ये घायवळ टोळीने एकाला नाही तर दोघांना...'

Kothrud Firin Nilesh Ghaywal Gang Police : पुण्यातील कोथरुड परिसरात निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार करत एक जणाला गंभीर जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयत्याने हल्ल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. गुंड निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी एकाच रात्री दोन जणांवर हल्ला करून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी धक्कादायक माहिती उघड केली असून, या घटनेमुळे कोथरूड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घायवळ टोळीच्या चार गुंडांनी दोन गाड्यांवरून येत प्रकाश धुमाळ याच्यावर गोळीबार केला. "आम्ही इथले भाई आहोत," असे ओरडत त्यांनी एक गोळी फायर केली, जी धुमाळ यांच्या मांडीवर लागली. याच रात्री, त्याच टोळीने वैभव साठे याच्यावर कोयत्याने क्रूर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या दोन्ही घटनांनी परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही घटना दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने घडले असून जखमी झालेले व्यक्तींचे आणि आरोपींचे कोणतेही पूर्व वैमनस्य नव्हते.

पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, या प्रकरणातील सर्व आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि मोका कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काल रात्रीच्या या दोन हल्ल्यांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी मयूर कुंबरे, गणेश राऊत, रोहित आखाडे, मुसा शेख आणि इतर काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात निलेश घायवळ याचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी घायवळ टोळीशी संबंधित असून, यापूर्वी मारणे टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे. या प्रकरणातही पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. "आम्ही कोणतीही दहशत सहन करणार नाही. या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा होईल, याची खात्री करू," असे संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT