sushma andhare, rupali chakanakar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sushma Andhare : पुण्यातील ‘त्या’ खून प्रकरणावरून अंधारेंनी केली चाकणकरांवर टीका; म्हणाल्या, महिला आयोगावर...

Pune murder case : राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टोला लगावला.

Sachin Waghmare

Pune News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले आहे. त्यानंतरही सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. पुण्यामध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाकडून हल्ला करण्यात आला त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

दोन दिवसापूर्वीच पुण्यामध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या तरुणीच्या कंपनीत काम करणाऱ्या तरुणाकडूनच या तरुणीवर हल्ला करण्यात आला. या घटनेनेनंतर पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याच प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Aandhare) यांनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना टोला लगावला.

पुण्यात बुधवारी एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची हत्या करण्यात आली. तिच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने ही हत्या केली. शुभदा कोदारे असे या युवतीचे नाव आहे. तर कृष्णा कनोजिया असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. वडील आजारी असल्याचं खोटे सांगून या तरुणीने या तरुणाकडून पैसे घेतले होते. मात्र तिचे वडील आजारी नसल्याचं समजल्यानंतर या तरुणीकडे पैसे परत करण्याचा देण्याची मागणी केली होती. यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकारणानंतर अंधारे यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. वारंवार कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्या वरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. अशा स्वरूपाच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना त्यावर उपाय योजना करण्याची गरज असताना या विषयाकडे गांभीर्याने पहिले जात नसल्याची टीका ही अंधारे यांनी केली.

पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तरुणीची हत्या करण्यात आली, त्यामुळे वारंवार कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या सगळ्या वरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. महिला आयोगावर कचकड्याच्या भावल्या बसवल्यामुळे त्यांच्याकडून फार गांभीर्याने काही गोष्टी केल्या जातील ही अपेक्षा व्यर्थ आहे, असा टोलाही यावेळी बोलताना त्यांनी रुपाली चाकणकर यांचे नाव न घेता लगावला आहे. त्यामुळे आता यावरून येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT