
Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला. या हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या खून प्रकरणातील फरार असलेल्या एका आरोपीचा शोध घेतला जात असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना परळी शहरात वर्षभरात 109 मृतदेह सापडले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
परळीत मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. एकट्या परळी शहरात 109 मृतदेह मिळत असतील तर या जिल्ह्याची स्थिती काय असेल. माहिती पुढे येते की फक्त या मध्ये तिघांची चौकशी व्यवस्थित होताना दिसत आहे. बाकीच्या प्रकरणात म्हणजे 106 प्रकरणात चौकशी सुद्धा नीट झालेली नाहीत. या ठिकाणी पोलीस यंत्रणेवर जो मोठ्या प्रमाणावर तिथल्या आमदारांचा आणि वाल्मिक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे म्हणूनच मी परत परत तेच म्हणते की धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.
परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची परिस्थिती आता सध्या तिथे आहे. खूप गंभीर म्हणजे लोक जे आम्हाला पुरावे देतात व्हिडिओ देतात फोटो देतात. प्रत्येकाचे हेच म्हणने आहे. दहशत खूप मोठी आहे, फक्त आमचं नाव देऊ नका माहिती आम्ही सगळे द्यायला तयार आहोत, असे मत अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी व्यक्त केले आहे.
परळी तालुक्यातील लाडकी बहीण योजनेच्या अध्यक्षपदी वाल्मिक कराडची शिफारस करण्यात आली आहे. वाल्मीक कराड याच्यावर 22 अशी गंभीर आणि इतर 23 सेक्शन अनेक वेळा लागले होते. तर असे 45 सेक्शन लागणाऱ्या व्यक्तीला जर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा अध्यक्ष बनवले गेले तर याच्याहून धक्कादायक दुसरे काहीच होऊ शकत नाही. त्याची शिफारस सुद्धा धनंजय मुंडे यांनी केली हे जेव्हा कळते तेव्हा अतिशय शॉकिंग आहे.
या सर्व प्रकारामुळेच मी परत परत म्हणते की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन वेगळे व्यक्ती नाहीत तर एकच व्यक्ती असल्यासारखे काम करतात, असा आरोप ही यावेळी दमानिया यांनी केला. त्यामुळेच येत्या काळात वाल्मीक कराडची चौकशी योग्य रीतीने होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बाहेर गेले पाहिजे, अशी मागणी यावेळी अंजली दमानिया यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.