Amol Kolhe And Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Shirur Loksabha : अमोल कोल्हे-आढळराव पाटलांचं दिल्लीत मनोमिलन; एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराची यशस्वी मध्यस्थी

Pune-Shirur Ex-MP Shivajirao Adhalrao Patil MP Amol Kolhe & MP Shrirang Barne Meet at Delhi Constitutional Club : शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची अनपेक्षित भेट झाली.

Pradeep Pendhare

Delhi political news Maharashtra : शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे अन् शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत झाली. या राजकीय लढत, राज्यासह देशात लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत शिवाजीराव पाटील अन् अमोल कोल्हे यांच्यात राजकीय वितुष्ट आलं. या निवडणुकीत कोल्हे विजयी झाले.

पण कोल्हे अन् शिवाजीराव एकमेकांविरोधात राजकीय वैर वाढलंच गेलं. परंतु राजकारणात कधीच वैर राहत नसतं, तसंच काहीसं शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्याबाबत झाल्याचं दिसतं. दिल्ली इथं हे कट्टर राजकीय वैरी एकत्र आले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे याला कारणीभूत ठरले, हे वेगळंचं!

दिल्लीत ‘कॉन्स्टिट्युशन क्लब’मध्ये मतदानावेळी शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची अनपेक्षित भेट झाली. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते हसतमुखाने संवाद साधला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने झालेले हे मनोमिलन चर्चेचा विषय ठरले. यावेळी कोल्हे यांनी आढळरावांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्याचे स्वतः पोस्टमध्ये नमूद केले. आढळरावांनी नेमका कोणता आशीर्वाद दिला, हे गुलदस्त्यातच ठेवले. तीन पक्षांचे विरोधक दिल्लीत एकत्र येऊन संवाद साधत असल्याने स्थानिक राजकारणातील कटुता संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत.

शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करणे ही 2019 पर्यंत अशक्यप्राय बाब मानली जायची. 2019 मध्ये शरद पवार यांनी मोठी राजकीय खेळी खेळली अन् अमोल कोल्हे यांना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले. त्यावेळी अमोल कोल्हे हे टेलिव्हिजनवरील ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमुळे प्रचंड लोकप्रिय होते.

शरद पवारांनी त्यांना शिरुरमधून रिंगणात उतरवले अन् मातब्बर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हे जायंट किलर ठरले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा राखली. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना ऑफर दिल्याची चर्चा होती. मात्र, अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

अमोल कोल्हे यांची ओळख आता शरद पवारांच्या जवळचा नेता म्हणून, अशी आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत, अमोल कोल्हे यांनी भावनिक राजकारणाचा फायदा घेत पुन्हा दिल्ली गाठली. यावेळीही लढतीत, त्यांच्यासमोर शिवाजीराव आढळराव पाटील होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडून, शिवाजीराव अजितदादांच्या राष्ट्रवादीत आले. कोल्हे अन् शिवाजीराव यांच्यात या निवडणुकीनिमित्ताने जोरदार राजकीय लढत झाली.

या निवडणुकीनिमित्ताने कोल्हे अन् शिवाजीराव यांच्यात राजकीय वैर वाढलं. दोघं एकत्र येणार की नाही येणार, अशी चर्चा असताना, दिल्लीत हे दोघं नेते एकत्र आल्याची खबर आली आहे. या दोघांचं दिल्लीतील मनोमिलन विरोधकांना सूचक, असा इशारा देखील असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT