Rahul Gandhi Attend Ashadhi Wari BJP opposed  sarkarnama
महाराष्ट्र

Ranjeetsinha Naik-Nimbalkar : राहुल गांधींना पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास भाजपचा विरोध, 'फक्त दर्शन...'

Rahul Gandhi Attend Ashadhi Wari BJP opposed : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधी पालखी सोहळ्यात पायी चालणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो, असे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.

Roshan More

Rahul Gandhi News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यंदा प्रथमच आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. 14 जुलैला ते पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्यास आणि पालखी सोहळ्यात पायी चालण्यास भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे.

पालखी सोहळ्यात राहुल गांधी यांनी कॅटवाॅक करू नये. राहुल गांधी, शरद पवारांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे त्याला आमचा विरोध नाही. मात्र, राजकारणासाठी पालखी सोहळ्यात पायी चालू नये, असे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले आहेत.

रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, उभ्या आयुष्यात राहुल गांधीने माऊलींचे, विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी ते पालखी सोहळ्यात पायी चालणार असतील तर त्याचा आम्ही निषेध करतो. पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊन निंबाळकर यांनी राहुल गांधीना विरोध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी पालखी मार्ग बनवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, पुणे, आळंदीसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी दिला. मात्र, याचा राजकारणासाठी आम्ही उपयोग करत नाही. पालखीमध्ये राजकीय मंडळीनी शोबाजी करण्याचे काम केले नाही. निवडणुकीत वारकऱ्यांचा फायदा घेण्याचे काम राजकीय पक्ष करत आहेत, असे निंबाळकर म्हणाले.

राहुल गांधी 14 जुलैला पालखी सोहळ्यात

राहुल गांधी Rahul Gandhi 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. ते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेणार आहेत. सर्वसामान्य वारकऱ्यांप्रमाणे राहुल गांधी पायी वारीत चालतील, अशी माहिती काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिली होती. राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी शरद पवार यांनी त्यांची भेट घेत पालखी सोहळ्याची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT