Congress Politics : काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला, निवडणूक स्वबळावर लढणार!

Haryana delhi assembly Election : ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये कोणतीही आघाडी न करता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. हरियाणा आणि दिल्ली या दोन राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तर, महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये काँग्रेस महाआघाडीसोबत लढणार आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, दिल्ली आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कोणतीही आघाडी न करता स्वबळावर लढेल.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये कोणतीही आघाडी न करता काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या MVA सोबत महायुतीला टक्कर देईल.

पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये झारखंडची तर फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चासह काँग्रेस झारखंडमध्ये सत्तेत आहे. झारखंड मुक्ती मोर्चासह काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चासोबत काँग्रेस भाजपच्या विरोधात लढेल.

Congress
BJP Vs Vijay Wadettiwar : 'विजय वडेट्टीवार अदानी बद्दल बोलताना तुमचे मालक...? ' ; भाजपने प्रत्युत्तर देत लगावला टोला!

'आप'ने सोडला हात

लोकसभा निवडणुकीत दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या जागा काँग्रेस आणि 'आप'ने आघाडी करून लढल्या होत्या. या आघाडीला दिल्लीत यश मिळाले नाही. दिल्लीतील सातही लोकसभा जागांवर काँग्रेस Congress,आपचा पराभव झाला. लोकसभा निकालानंतर 'आप'ने स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले होते.

पश्चिम बंगालमध्ये काय होणार?

पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत आघाडी होती. तर, ममता बॅनर्जी या आघाडीत नव्हत्या. जयराम रमेश म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये इंडीया आघाडी ही लोकसभा निवडणुकी पुरती असेल असे आम्ही म्हणालो होतो. मात्र, येथील परिस्थिती पाहता येथील आमचे नेते तसेच इंडिया आघाडीतील नेत्यांच्या मतानुसार येथे आघाडी पुढे कायम असायला हवी.

Congress
Modi Government Breaking : मोदी सरकारची धाकधूक वाढली; संकटकाळात भाजपच्या मदतीला कायम धावून येणारा 'हा' पक्ष साथ सोडणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com