Rahul Gandhi arriving at Bhiwandi court for defamation hearing, accompanied by Congress leaders amid tight security. Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi : काँग्रेसच्या विजयानंतर राहुल गांधी दुसऱ्याच दिवशी थेट भिवंडीमध्ये : कोर्टात गेले अन् जामीनही घेऊन आले; हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार

Harshvardhan Sapkal Bail Guarantor : राहुल गांधी भिवंडी मानहानी प्रकरणात न्यायालयात हजर झाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली. पुढील सुनावणी 14 मार्च 2026 रोजी होणार असून राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bhiwandi Court News : शुक्रवारी भिवंडीमध्ये काँग्रेसच्या मदतीने नारायण चौधरी महापौर झाले. चंद्रपूरचा बदला काँग्रेसने भिवंडीत घेतल्याची चर्चा असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आज (ता. 21) भिवंडीमध्ये आगमन झाले. ते भिवंडीमध्ये नेमके का आले होते याच कारण समोर आले आहे.

2014 निवडणुकीत राहुल गांधींनी भिवंडीमध्ये झालेल्या सभेत आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली होती, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. तिच्या सुनावणीसाठी आज (शनिवारी ता. 21) राहुल गांधी भिवंडीमधील कोर्टात हजर झाले होते.

भिवंडी मानहानी प्रकरणात राहुल गांधींचे पूर्वीचे जामीनदार, माजी केंद्रीय गृहमंत्री जेष्ठनेते शिवराज पाटील चाकूरकर हे होते परंतू त्यांचे डिसेंबर 2025 मध्ये निधन झाले. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार नवीन जामीनदार देणे आवश्यक होते. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज कोर्टात राहुल गांधी यांचा जामीन दिला. न्यायालयाने त्यांचे जामीनपत्र स्वीकारले आहे.

राहुल गांधींनी त्यांच्या 6 मार्च 2014 च्या सार्वत्रिक निवडणुक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेतील भाषणात "आरएसएसच्या लोकांनी गांधीजींची हत्या केली" असे विधान केले होते, त्याविरोधात आरएसएसचे भिवंडी येथील स्थानिक जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यांनी संस्थेची बदनामी केली म्हणत राहुल गांधींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत तक्रार दाखल केली होती.

भिवंडी कोर्टाने राहुल गांधींना स्वतः हजर राहून जामीनपत्राची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली आहे, व न्यायालयाने हे जामीनपत्र स्वीकारले आहे.

पुढील सुनावणी 14 मार्चला

राहुल गांधींचा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सुनावणी 14 मार्च 2026 रोजी होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी भिवंडीमध्ये येत असताना त्यांना ठाणे ते भिवंडीच्या दरम्यान एका टोलनाक्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांना निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT