Bhiwandi Mayor election : भिवंडीत भाजपचा गेम : काँग्रेसला मदत करणाऱ्या 6 बंडखोर नगरसेवकांची नावे समोर, एकाच प्रभागातील अख्खी फळी उद्ध्वस्त

Narayan Chaudhary rebel win News : भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोडी घडली. भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी फूट पडल्याने भिवंडीतील राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरले.
Narayan Choudhari
Narayan ChoudhariSarakrnama
Published on
Updated on

Bhivandi News : भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोडी घडली. भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी फूट पडल्याने भिवंडीतील राजकारण 360 डिग्रीमध्ये फिरले. या ठिकाणी मोठी उलथापालथ झाली अन् भाजपचा बंडखोर नगरसेवक काँग्रेसच्या पाठींब्यावर महापौरपदी विराजमान झाला. निवडणुकीपूर्वी दोन दिवस अगोदर महापौर पदाचा उमेदवार भाजपने बदलण्याचा केलेला प्रयोग त्यांच्या अंगलट आला आहे. उमेदवारी ऐनवेळी कापल्याने भाजपचे नगरसेवक नारायण चौधरी यांनी बंड करीत काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले आहेत. दुसरीकडे भाजपचे नगरसेवक सुहास नकाते यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिलेली असतानाही त्यांनी ही बंड करीत भाजप विरोधात एल्गार पुकारला.

भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीआधीच राजकीय दृष्ट्या मोठी उलथापालथ होणार हे स्पष्ट झाले होते. भाजपने महापौर पदाचा ऐनवेळी उमेदवार बदलल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला होता. भाजपने नारायण चौधरी यांच्याऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींच्या गटाच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापौर निवडणुकीत ट्विस्ट पाहवयास मिळाला भाजपच्या एका गटाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठींबा दिल्याने सर्वांचे महापौर पदाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते.

Narayan Choudhari
BJP Politics : पवार, सिंघवी, आठवलेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; भाजप कोणता डाव टाकणार, विरोधकांची कोंडी कशी करणार?

शुक्रवारी दुपारी भिवंडीच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यावेळी चंद्रपूरमध्ये हाताशी आलेले महापौर पद भाजपने काँग्रेसकडून हिसकावून घेतले होते. त्याचा बदला काँग्रेसने भिवंडीमध्ये घेतला आहे. भाजपचे नऊ नगरसेवक फुटले असल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्षात सहा नगरसेवक फुटल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच काँग्रेस सेक्युलर फ्रंटचा महापौर भिवंडीमध्ये झाला.

Narayan Choudhari
bjp shivsena UBT alliance : महापालिका ‘युतीचा पॅटर्न’ ZPतही! भाजप-ठाकरे समीकरणाने शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी विजयी झाले. महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना 48 मते पडली तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 मते मिळाली तर कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना 25 मते मिळाली. त्यामुळे बंडखोर नारायण चौधरी विजयी झाले.

Narayan Choudhari
NCP merger controversy: सुनील तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना नव्हती का? अमोल कोल्हेंचे मोठे विधान, म्हणाले, 'एबी फॉर्म कोणी दिले'

महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे-12, तर भाजपचे 6 असे एकूण 48 मते पडली तर विलास पाटील यांना कोणार्क विकास आघाडीचे 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 12, समाजवादी पक्षाचे 6, भिवंडी विकास आघाडीचे 3 असे एकूण 25 मते मिळाली तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना भाजप - 16 तर एक अपक्ष गैरहजर राहिला.

Narayan Choudhari
Congress News : बड्या नेत्याची काँग्रेसला सोडचिठ्ठी, लगेच राहुल गांधींचा फोन; मुख्यमंत्र्यांनी थेट घर गाठलं, भाजपमध्ये प्रवेश ठरला...

भाजपमधील फुटलेल्या सहा नगरसेवक पुढीलप्रमाणे :

भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीवेळी भाजपचे नऊ नगरसेवक फुटणार अशी चर्चा रंगली होती. प्रत्यक्षात सहा नगरसेवक फुटल्याचे समोर आले आहे. या फुटलेल्या नगरसेवकांमध्ये महापौर नारायण चौधरी, नगरसेविका नंदीनी गायकवाड (प्रभाग 17 अ), अश्विनी फुटाणकर (बिनविरोध प्रभाग 18 अ), दिपा मढवी (प्रभाग 18 ब), शेख अबूशाह (प्रभाग 18 क ), सुहास नकाते (प्रभाग 18 ड) यांचा समावेश आहे.

Narayan Choudhari
BJP Vs Shivsena : भाजप-शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये तणाव! अंकुश कदमांच्या बॅनरनंतर नाईक समर्थक संतप्त

दरम्यान, भाजपमधील हे सहा बंडखोर नगरसेवक हे आमदार महेश चौगुले यांचे समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उपमहापौर पदासाठी भाजपने दिलेला उमेदवारही काँग्रेसने फोडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भिवंडीतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Narayan Choudhari
NCP merger controversy: सुनील तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना नव्हती का? अमोल कोल्हेंचे मोठे विधान, म्हणाले, 'एबी फॉर्म कोणी दिले'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com