

Congress News : भाजपकडून बंडखोरी करत नारायण चौधरी हे भिवंडी महापालिकेचे महापौर झाले. त्यांना काँग्रेसची 30 शरद पवारांची 12 आणि भाजप बंडखोरांची सहा अशी 48 मतं मिळाली. प्रथमच भाजपची नगरसेवक फोडत काँग्रेसने गेम फिरवला.
भाजपच्या स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतं मिळाली. भाजपचे 22 नगरसेवक असताना त्यांनी 16 मतं मिळाली म्हणजे सहा मतं फुटली हे स्पष्ट आहे.
नारायण चौधरी हे भिवंडीमध्ये बांधकाम व्यावसायिका म्हणून परिचित आहेत. 2002 पासून भिवंडी पालिका राजकारणात भिवंडी विकास आघाडीच्या माध्यमातून सक्रीय झाले. 2007 मध्ये समाजवादी कडून विजयी तर दोन वेळा त्यांच्या पत्नी अलका चौधरी दोन वेळा शिवसेना पक्षाकडून विजयी झाल्या होत्या.
नारायण चौधरी यांना भाजपने महापौर पदाचा शब्द दिला होता. मात्र, ऐनवेळी शब्द फिरवत त्यांचे जाहीर झालेले नाव मागे घेत स्नेहा पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले. यामागे भाजपचे शहराध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. मात्र, यातून चौधरी हे प्रचंड दुखावले गेले. त्यामुळे त्यांनी रिस्क घेण्याची तयारी दाखवली आणि त्यातूनच काँग्रेसने संधी साधली.
काँग्रेसकडे सर्वाधिक 30 नगरसेवक होते. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीलासोबत घेत त्यांच्याकडे 42 सदस्यसंख्या होत होती. समाजावादी पक्षाने त्यांना सुरुवातील पाठींबा दिला होता. मात्र, ऐनवेळी महापौर पदासाठ आडून बसले. त्यामुळे काँग्रेस आघाडीला बहुत नसल्याचे चित्र समोर आले. आपला महापौर होणार नाही हे काँग्रेसला स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच त्यांनी उपमहापौर पद घेत महापौर पद बंडखोर चौधरी यांना दिले.
भाजपच्या ज्या सहा नगरसेवकांनी बंडखोरी केली त्यामध्ये सुहास नकाते हे देखील होते. तेच भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार होते.विशेष म्हणजे त्यांना भाजपच्या 22 पैकी 21 नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजपमधील बंडखोरी ही वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादानेच झाली असल्याची चर्चा आहे.
विलास पाटलांना रोखले पण...
विलास पाटील यांची कोणार्क आघाडी ही भिवंडीमध्ये नेहमीच प्रभावशाली राहिली आहे. दहा वर्षांपेक्षा अधिक वर्ष महापौर पद विलास पाटील यांच्या कोणार्क आघाडीकडे राहिले होते. त्यामुळे विलास पाटलांना थांबवण्यासाठी सगळेच पक्ष भेद विसरून एकत्र आल्याची चर्चा आहे. त्यामध्ये भाजप एका आमदाराचे आणि शरद पवारांचे खासदार बाळ्यामामांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे चौधरींना रिस्क घेण्यासाठीसाठी भाजपच्या पडद्यामागच्या हालचालींमुळे पाठबळ मिळाले.
नारायण चौधरी (भाजप बंडखोर)
- 48 (काँग्रेस 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 12, भाजप बंडखोर 6)
विलास पाटील (कोणार्क विकास आघाडी)
- 25 (शिंदे शिवसेना 12 + कोणार्क विकास आघाडी 4 + समाजवादी 6 + भिवंडी विकास आघाडी 3)
स्नेहा पाटील
भाजप - 16 (6 मतं फुटली)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.