Devendra Fadnavis, Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Opposition Protest: ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील राहुल गांधींच्या आंदोलनाचं 'चीन कनेक्शन'..? CM फडणवीसांचा पहिल्यांदाच गंभीर आरोप

BJP Vs Congress: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव’ यात्रेत बोलताना विरोधकांच्या मोर्चावर सडकून टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी हे रोज व्हिएतनाम, थायलंडला जातात, तिकडे कशासाठी जातात? असा सवाल मी राहुल गांधींना करत असल्याचं म्हटलं.

Deepak Kulkarni

New Delhi News: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी, एसआयआर प्रक्रियेला तीव विरोध दर्शवत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या इंडिया आघाडीनं देशाची राजधानी दिल्लीत रविवारी(ता.1 नोव्हेंबर) अभूतपूर्व रॅली काढली. तृणमूल काँग्रेस,समाजवादी पार्टी यांच्यासह विरोधी बाकावरील सुमारे 20 पक्षांनी रामलीला मैदानावरील या आंदोलनात सहभाग घेत सत्ताधारी मोदी सरकारला धारेवरही धरलं. याचदरम्यान,विरोधकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडूनही देशभरात ठिकठिकाणी ‘लोकतंत्र बचाव’ यात्रा सुरू केली आहे. याच यात्रेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या आंदोलनावर पहिल्यांदाच गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या ‘लोकतंत्र बचाव’ यात्रेत बोलताना विरोधकांच्या मोर्चावर सडकून टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी हे रोज व्हिएतनाम, थायलंडला जातात, तिकडे कशासाठी जातात? असा सवाल मी राहुल गांधींना करत असल्याचं म्हटलं. भारताला पाण्यात पाहण्यासाठी,घुसखोरी करण्यासाठी कोणता देश आतूर आहे, तर तो चीन आहे. मग राहुल गांधी मला सांगा, चीनकडून काँग्रेस आणि तुमच्या ट्रस्टला डोनेशन का मिळत आहे,असा गंभीर आरोपांचा नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

तसेच देवेंद्र फडणवीसांनी यावेळी काँग्रेस पक्ष चीनच्या पैशांवर भारतात अराजकता तयार करत असल्याचं धक्कादायक विधानही केलं आहे. काँग्रेसला चीनकडून डोनेशन कसं मिळतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधक मोर्चा काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं तयार केलेल्या संस्थांना बदनाम करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे.

इंदिरा गांधी यांच्यासारखे राहुल गांधीही नागरिकांचे मूलभूत अधिकार संपवण्यासाठी मोर्चा काढत आहे. इंदिरा गांधींचा नातू आता पुन्हा तेच घेऊन रस्त्यावर उतरला आहे. दारू तीच आहे, फक्त बॉटल बदलली आहे. दारू तीच आहे. आता नीती बदलली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून देशात अराजकता निर्माण करण्यापाठीमागं एक कारण आहे. एक नवीन लाल पुस्तक आहे. लाल संविधान हा केवळ मास्क, मुखवटा आहे. याच लाल पुस्तकाचा वापर करत षडयंत्र करुन नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशचं संविधान बदलण्यात आलं आहे. आपल्या देशातही हेच घडवण्याचं विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

तसेच विरोधकांना जोरदार हल्लाबोल करताना एका हातात लाल संविधान ठेवता आणि दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं तयार केलेल्या संस्थांना बदनाम करता आहात. संविधान खराब म्हटलं, तर लोक जोड्यानं मारतील.म्हणून ते संविधान खराब म्हणत नाही. त्यामुळेच विरोधकांकडून सातत्यानं संविधानानं तयार केलेल्या संस्थांना बदनाम केले जात असल्याची टीका फडणवीसांनी आपल्या भाषणातून केली.

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधक यापूर्वी आरबीआय, सीएजी खराब असल्याचं सांगतात. यानंतर संसद संपवा म्हणत रस्त्यावर निर्णय करत असल्याचं बोलत आहे. ते देशाच्या संसदेला, निवडणूक आयोगाला शिव्या देत असून आता ते सर्वोच्च न्यायालयालाही शिव्या देत आहेत. विरोधकांचा हेच अराजकता पसरवण्याचं षडयंत्र असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT