BJP News: 'शिस्तप्रिय' भाजपकडून 'अक्षम्य' चूक...! हयात असताना विचारलं नाही, निधनानंतर वर्षभरातच नेत्याचं नाव थेट कार्यकारिणीत झळकलं

Uttar Pradesh Political News: एकीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच दुसरीकडे शिस्तप्रिय भाजपकडून अक्षम्य चूक घडली आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपमधील या सावळ्या गोंधळाचा मुद्दा उचलून धरत जोरदार टीका करण्यात येत आहे.
Uttar Pradesh BJP Mistake
Uttar Pradesh BJP Mistake Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Uttar Pradesh News: भारतीय जनता पक्ष हा नेहमीच शिस्तप्रिय संघटन आणि काटेकोर नियम तसेच त्यांचं तितकंच चोख अंमलबजावणीसाठी ओळखला जातो.मात्र,याच भाजपकडून पक्षसंघटनेच्या श्रम प्रकोष्ठ कार्यकारिणी प्रांतीय समितीची नियुक्ती करताना मोठी चूक घडली आहे. भाजपच्या श्रम प्रकोष्ठ कार्यकारिणीच्या प्रांतीय समितीमध्ये एक वर्षभरापूर्वी निधन झालेल्या नेत्याचा समावेश करण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

भाजपकडून शनिवारी (ता.31 ऑक्टोबर 2026) रोजी उत्तर प्रदेशच्या श्रम प्रकोष्ठ कार्यकारिणीच्या प्रांतीय समितीच्या 11 सदस्यांच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत आंबेडकरनगर येथील दिवंगत नेते भाजप नेते रामसूरत मौर्य यांचं नाव सदस्य म्हणून असल्याचं निदर्शनास आलं आहे.

भाजपच्या नेत्यांना आपला कार्यकर्ता जिवंत आहे की त्याचे निधन झाले आहे, याची साधी माहितीदेखील नसल्याचे समोर आले आहे. भाजपचे नेते रामसूरत मौर्य यांचे निधन होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, आता त्यांचा समावेश श्रम प्रकोष्ठच्या प्रांतीय समितीच्या यादीत करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश भाजपकडून अधिकृतपणे श्रम प्रकोष्ठ कमिटी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व समर्पित कार्यकर्ते राहिलेल्या दिवंगत रामसूरत मौर्य यांचंही नाव आहे. मात्र, त्यांचं साधारण एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर मोर्य यांना उत्तर प्रदेश भाजपकडून श्रम प्रकोष्ठच्या प्रांतीय समितीत जबाबदारी कशी सोपवण्यात आली असा सवाल उपस्थित करत थेट पक्षाच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवण्यात आलं आहे.

Uttar Pradesh BJP Mistake
Phaltan Politic's : फलटणच्या मतदान केंद्रावर कट्टर विरोधकांची जुगलबंदी : 'मतदान गंडतंय बघा’ रणजितसिंहांच्या गुगलीवर रामराजेंचा स्ट्रेट ड्राइव्ह ‘तुम्ही गंडवू शकता, ते नाही’

भाजपकडून या चुकीची गंभीर दखल घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. एकीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच दुसरीकडे शिस्तप्रिय भाजपकडून अक्षम्य चूक घडली आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपमधील या सावळ्या गोंधळाचा मुद्दा उचलून धरत जोरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन श्रम प्रकोष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कमिटीच्या यादीत थेट हयात नसलेल्या नेत्याचं नाव आल्यानं संबंधित यादी तयार करण्याची प्रक्रिया आणि संघटनेच्या कार्यपद्धतीवरुन झाडाझडती होण्याची शक्यता आहे. तसेच या गंभीर चुकीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.

Uttar Pradesh BJP Mistake
Nagpur Congress : नागपूरची जागा जिंकली, पण काँग्रेस नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू : 'त्या' फोटोवरून ठाकरेंनी सुनावलं

विशेष म्हणजे, संघटनेसाठी योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्याच्या हयातीत त्यांची दखल घेण्यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र, निधनानंतर त्यांना पदाधिकारी बनवण्यात आले. ही केवळ यादी तयार करताना झालेली चूक नसून, कार्यकर्त्यांप्रती संघटनेची संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व यावरही प्रश्न उपस्थित करणारी बाब आहे.

उत्तर प्रदेश भाजपकडून श्रम प्रकोष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रांतीय समितीची यादी जाहीर करण्यापूर्वी जिल्हा संघटनेकडून माहिती किंवा सूचना मागवण्यात आल्या नव्हत्या का? जर अभिप्राय मागवण्यात आला होता, तर त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. निवडणुका जवळ येत असून भाजप मिशन-2027 च्या तयारीला लागला आहे.

Uttar Pradesh BJP Mistake
CM Fadnavis Foot March : दिल्लीत काँग्रेसचा मोर्चा, ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस्त्यावर उतरले, पदयात्रेतून निशाणा; म्हणाले,...

भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देव पटेल यांअशा प्रकारची लापरवाही संघटनेची तळागाळातील सक्रियता आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाबाबत अस्वस्थ करणारी आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष दिलीप देव पटेल यांनी प्रतिक्रिया देताना, "कुठेतरी चूक झाली आहे," असे मान्य केले. या चुकीची माहिती प्रदेश समितीला देण्यात आली असून लवकरच सुधारित यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ही यादी अंतिम करण्यापूर्वी योग्य पडताळणी न केल्यामुळे भाजपवर सध्या सोशल मीडियावरून मोठी नामुष्की ओढवली आहे. या चुकीमुळे कमिटीच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.