Rahul Gandhi  Sarkarnama
महाराष्ट्र

Rahul Gandhi Upset : राहुल गांधी महाराष्ट्रातील 'त्या' खासदारांवर नाराज, यादी तयार करायला सांगितले

Maharashtra MP Delhi Protest : राहुल गांधी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचे काही खासदार हे आंदोलनात सहभागी झाले नसल्याचे समोर आले आहे. या खासदारांकडे खुलासा मागण्यात आल्याची माहिती आहे.

Roshan More

Rahul Gandhi News : राहुल गांधींनी आक्रमक भूमिका घेत दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी त्यांनी दूरदर्शन केंद्राबाहेर आंदोलन केले.तर, बुधवारी जंतरमंतरवर आंदोलन केले. गुरुवारी देखील राजघाटवर इंडिया आघाडीतील सहकाऱ्यांसोबत आंदोलन केले.

आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस आपली ताकद दाखवत आहे. राहुल गांधी हे स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. पक्षाच्या सर्व खासदारांना आंदोलनात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही खासदार एक दिवसच आंदोलनात सहभागी झाले. तर काही खासदार तीनही दिवस आंदोलनाकडे फिरकले नाहीत.

आंदोलनात सहभागी न झालेल्या खासदारांवर राहुल गांधी नाराज असल्याची माहिती आहे. गैरहजर राहिलेल्या खासदारांची यादीच तयार करण्याची सूचना के सी वेणूगोपाल यांना राहुल गांधींनी केली आहे. तसेच आंदोलनात का सहभागी झाले नाही? याचे कारण देण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी श्रीवेल्ला प्रसाद यांनी गैरहजर राहिलेल्या खासदारांशी फोनद्वारे संवाद साधत गैरहजर राहण्याचे कारण विचारले. तसेच त्यांना तातडीने दिल्लीला येण्याच्या सूचना केल्या असल्याचे समजते.

आंदोलनात सहभागी खासदार

वर्षा गायकवाड, श्यामकुमार बर्वे, प्रशांत पडोळे, गोवाल पाडवी, शिवाजी काळगे हे खासदार मंगळवार, बुधवार दोनही दिवस आंदोलनात सहभागी झाले. तर, प्रणती शिंदे हे मंगळवारी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्या तर बुधवारी पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्या.

एक दिवस आंदोलनात

प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, शोभा बच्छाव, रवींद्र चव्हाण हे खासदार मंगळवारी झालेल्या आंदोलनात सहभागी झाले. तर, शाहू महाराज छत्रपती, विशाल पाटील, नामदेव किरसान, बळवंत वानखेडे हे एकही दिवस आंदोलनात सहभागी झाले नाही, असे वृत्त एका मराठी न्यूज चॅनलने दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT