Sanjay Raut, Rahul Gandhi News Sarkarnama
महाराष्ट्र

राऊतांचा लढा आणखी तीव्र होणार; राहुल गांधींनी मांडली काँग्रेसची भूमिका

Rahul Gandhi | Sanjay Raut | Shivsena : राहुल गांधींचे संजय राऊतांना पत्र

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Raut) यांनी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरविरोधाच ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राची दखल घेतली आहे. गांधी यांनी राऊत यांना पत्र लिहुन पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करित सुरु केलेल्या लढाईला पाठिंबा असल्याचे राहुल गांधी यांनी पत्रातुन सांगितले आहे. (Rahul Gandhi writes to Sanjay Raut)

काय म्हणाले आहेत राहुल गांधी ?

तपास यंत्रणांकडून तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना टार्गेट केले जात असलेल्या गोष्टीचा मी निषेध करतो. तुमच्या पत्रातून मोदी सरकार विरोधकांना शांत करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा खुलासा झाला आहे. त्यामुळे या पत्राच्या माध्यमातुन काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी असून कोणतीही भीती आणि अनुकूलता न दर्शवता तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहोत.

संजय राऊतांनी मानले आभार :

राहुल गांधी यांनी लिहिलेले ट्विटरला शेअर करत संजय राऊत यांनी त्यांचे त्यांचे आभार मानले आहेत. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या या आमच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावे लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत हे केवळ दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे. पण मला खात्री आहे, ही वेळ सुद्धा निघून जाईल.

उपराष्ट्रपतींना पत्र :

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहून काही खळबळजनक दावे केले होते. ''सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. ''ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले आहे,'' अशीही टीका राऊतांनी केली आहे. (Sanjay Raut Letter To Vice President)

तुरुंगात डांबण्याची धमकी

सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असे संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटलं होते.

माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात. असेही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी

आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT