लतादीदींवरील ट्रोलवरुन प्रकाश आंबेडकर संतप्त ; टि्वट करुन झोडपलं

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल केले. वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.
lata mangeshkar
lata mangeshkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी लतादीदींच्या निधनानं विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त होत होते, सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल केले. याबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही याचा निषेध व्यक्त केला आहे. आंबेडकरांनी याबाबत टि्वट केलं आहे.

''काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो,'' असे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

''काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो,'' असे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

''पार्श्वगायिका लता मंगेशकर यांच्या निधनाची दु:खद बातमी समजली. त्यांनी चित्रपट संगीत,भाव संगीत व अभंग गीत गायनातून भारतीय संगीत क्षेत्रात भरिव योगदान दिले. त्यांना भावपुर्ण आदरांजली,'' अशा शब्दात टि्वट करुन आंबेडकरांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

''माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही. दयाळू आणि सर्वांची देखभाल करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कधीच भरून निघणारं नाही. आपल्या सूरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता होती. भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून येणारी पिढी त्यांना कायम स्मरणात ठेवेल,'' अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईतील शिवाजी पार्क येथे (Shivaji Park) शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

lata mangeshkar
फडणवीसांबाबत न बोलणचं बरं, तिखट प्रतिक्रिया येतात ; खडसेंचा सावध पवित्रा

मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ram nath kovind), रा्ज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आदींनी ट्विटरवरून लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. लतादीदींच्या निधनानं देशात दोन दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला आहे. तर राज्यात आज सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.

भाजप (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी शिवाजी पार्कवर लतादीदींचंही स्मृतीस्थळ उभारण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी या संदर्भात पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

lata mangeshkar
शिवसेनेचा हल्ला पूर्वनियोजित ; सोमय्यांचा व्हिडिओ व्हायरल

''लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, असं म्हणत संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीला विरोध केला आहे. काहींनी शिवाजीपार्कवर लतादीदींच स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी केली. पण त्यांनी मागणी करण्याची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लतादीदींच्या स्मारकाबाबत देशाने विचार करायला हवा. लतादीदी राजकारणी नव्हत्या. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही त्यांच स्मृतीस्थळ उभारण्याचा विचार करावा लागेल,'' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com