Raj Thackeray Rally In Mumbai News Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray News : राज ठाकरे 'हा' उल्लेख करायचा विसरले अन् विजयी मेळाव्यानंतर व्यक्त केली दिलगिरी..

After a successful victory rally, Raj Thackeray shared a heartfelt post on social media expressing regret over a specific incident. : मराठी भाषेचा पुरस्कार, हिंदी सक्ती विरोधाच्या लढ्यात ज्या मराठी प्रसार माध्यमं, वृत्तपत्र, संस्था, कला क्षेत्रातील कलाकारांनी साथ दिली, या ते ठामपणे उभे राहिले त्या सर्वांचा उल्लेख राज ठाकरे भाषणात विसरले

Jagdish Pansare

MNS News : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा राज आणि उद्धव ठाकरे यांचा मराठीच्या मुद्यावर एकत्रपणे घेण्यात आलेल्या विजयी मेळाव्याची देशभरात चर्चा सुरू आहे. मराठी भाषा, माणूस यासाठी एकजूट दाखवत हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पण हा मोर्चा निघण्यापुर्वीच सरकारने हिंदी भाषे संदर्भात काढलेले दोन्ही जीआर मागे घेतले. त्यानंतर ठरलेल्या तारखेला मोर्चा ऐवजी विजयी सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आजच्या विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांची भाषणं आक्रमक झाली. हा मेळावा प्रचंड यशस्वी ठरला. परंतु मेळावा संपल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून केली आहे. नेमकी ही दिलगिरी त्यांनी का व्यक्त केली? तर मराठी भाषेचा पुरस्कार आणि हिंदी सक्ती विरोधाच्या लढ्यात ज्या मराठा प्रसार माध्यमं, वृत्तपत्र, संस्था, कला क्षेत्रातील कलाकारांनी साथ दिली, या लढ्यात ते ठामपणे उभे राहिले त्या सर्वांचा उल्लेख राज ठाकरे आपल्या भाषणात करण्यास विसरले होते.

या संदर्भात राज ठाकरे यांनी नुकतीच पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे. हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. (MNS) या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो.

हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले. त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो, अशा शब्दात राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

केडियाची माफी..

दरम्यान, मुंबईतील गुजराती व्यापारी असलेल्या सुशील केडिया यांनी काल मराठीच्या मुद्द्यावरुन एक चिथावणीखोर विधान केलं होतं. मी 30 वर्षे महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलणार नाही, बोला काय करणार? अशा शब्दांत थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. पण आज त्यांनी आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत केडिया यांनी हा वाद आता संपवा,अशी राज ठाकरेंना विनंतीही केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या कार्यालयावर नारळफेक कर तोडफोड केली. त्यानंतर केडियांनी माघार घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT