Raj-Uddhav Thackeray Alliance : राज-उद्धव ठाकरे एका मंचावर आले, भाजप आमदाराने पहिला वार केला; म्हणाले, 'मराठी नाही...'

Raj thackeray uddhav thackeray Parinay Fuke :मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी जो चुकीचा निर्णय घेतला होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे, असे आमदार फुके म्हणाले.
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Parinay Fuke News : मराठी आणि हिंदी भाषेच्या वादाने राज्यात चांगलाच जोर पकडला आहे. आंदोलनाचा इशारा दिल्याने फडणवीस सरकार घाबरले, त्यांनी हिंदी सक्तीचा आदेश घ्यायला आम्ही भाग पाडले असे सांगून आज राज आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे विजयी सभा आज वरळीमध्ये घेतली.

ठाकरे बंधु एकाच मंचावर आले असताना भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधुंचा दारुण पराभव झाला आहे. दोन्ही सेनेचे अस्तित्व आता राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना आता एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.खरेतर ठाकरे बंधू यांनी विजयी मेळावा घेण्याऐवजी आभार सभा घ्यायला हवी होती.'

'मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी जो चुकीचा निर्णय घेतला होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला आहे. त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजे. हिंदी सक्तीचा कोणी आदेश काढला आणि कोणी मागे घेतला हे मुंबईच्या मराठी माणसाला ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना दोघे भाऊ एकत्र आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या काळात यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी दोघांनी एक मेकांना टाळी दिली नाही. आता कशासाठी ते एकत्र येत आहे हे सर्वांना कुळून चुकले आहे. एकत्र येणे ही त्यांची राजकीय मजबुरी आहे. जेव्हा सुपडा साफ झाला तेव्हा दोन्ही भाऊ कशासाठी एकत्र येत आहे हे सर्वांना कळते.', असाही टोला फुके यांनी लगावला.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: हिंदीबाबत फडणवीसांची गुंडगिरी सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंनी फटकारलं

मुंबई महापालिकेसाठी एकत्र

विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सेनेचे फक्त २० आमदार निवडूण आले. राज ठाकरे यांच्या मनसेला खातेही उघडता आले नाही. त्यांचा एकमेव आमदार होता. तोसुद्धा पराभूत झाला आहे. नुसती गर्दी करून मते मिळत नाही हे त्यांना कळून चुकले आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचेच आमदार सोडून गेले आहे. त्यांनी पक्षचिन्हसुद्धा गमावले आहे. त्यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिला नाही. असेच आपसात भांडत राहिलो तर मुंबई महापालिकासुद्धा हातातून जाईल अशी भीती उद्धव ठाणि राज ठाकरे यांना वाटत आहे. यासाठी ते एकत्र आले आहेत. मराठी-हिंदीचा वाद यासाठी त्यांनी मोठा केला असल्याचा आरोपही फुके यांनी केला.

Raj Thackeray, Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Raj Thackeray speech : ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकतात... राज ठाकरेंनी आडवाणींपासून ते जयललितांपर्यंत सगळ्याचं शिक्षण काढलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com