
Shivsena-MNS Alliance: मराठी आंदोलनाच्या विजयाची सभा सध्या मुंबईत वरळी डोममध्ये सुरु आहे. या सभेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. पण सर्वांच्या मनात प्रश्न होता की शिवसेना-मनसेमध्ये युती होणार का? पण आता हा संभ्रम दूर झाला आहे. कारण उद्धव ठाकरेंनी सभागृहात युतीची घोषणा केली.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, त्यानं मला सन्माननिय उद्धव ठाकरे असं बोललं आहे. सहाजिकच आहे त्याचंही कतृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननिय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या हिंदू, मराठी बंधुंनो आणि बांधवांनो. अप्रतिम मांडणी राजनं केलेली आहे. मला वाटतं माझ्या भाषणाची गरज नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सहाजिकच सर्वांचं लक्ष आज भाषणाकडं आहे. पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्रित दिसणं महत्वाचं आहे.
एक गोष्ट नक्की आमच्या दोघांमध्ये जो आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी! उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर सभागृहात एकच जल्लोष झाला. ठाकरे पुढे म्हणाले, आज मला कल्पना आहे की, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय कोण टाचण्या टोचतंय. कोणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतोय या सर्व भोंदूपणाविरोधात माझ्या आजोाबांनी लढा दिला होता आणि त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे ठाकलेले आहोत.
भाषेवरुन जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरुन चालणार नाही. मधल्या काळात मी राजनं आणि आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसतील तर तुम्हाला कोण ओळखत होतं या महाराष्ट्रात. कोणत्या भाषेत बोलत होतात? भाजपनं ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी उठवलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण हिंदुत्व हे कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कट्टर आणि कडवट देशाभिमानी हिंदू आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.