Mumbai News : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचे वाभाडे काढले. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली एसआयआर प्रक्रिया संपूर्णपणे रद्द झाली पाहिजे. मोदी सरकारमधील माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी SIR बद्दल जे काय म्हटलय ते वाचून दाखवत त्यांनी SIR बेकायदेशीर आहे. कायद्यात तशी तरतूदच नाही. समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर अशावेळी एसआयआर केले जाऊ शकते. म्हणजे एसआयआर बेकायदेशीर आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यासोबतच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात रविवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीने "गर्जना" मोर्चा काढण्यात आला. 'मेट्रो सिनेमा' ते 'बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय' असा मोर्चा निघाला. या मोर्चामुळे मुंबईतील वातावरण चांगलेच तापले होते. या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रविवारी सकाळपासूनच शिवसैनिकांनी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
चार वर्षांपासून मी सांगत होतो निवडणूक आयोगात चोऱ्या सुरु आहेत. २०१७-१८ पासून मतचोरी झाल्याचे मी सांगत आहे. या मध्ये घोळ झाला असल्याने निवडणूकांवर बहिष्कार टाका, असे मी म्हणालो होतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. राज्यात विजय मिळाल्यानंतर उत्साह व जल्लोष दिसत नव्हता. विधानसभा निवडणुकीपूर्वी ४० ते 60 लाख मतदार वाढले, असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
निवडणूक आयोगाचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यासोबतच सरकारचा सर्वच बाबतीत मनमानी कारभार सुरु आहे. सरकारने सर्वच यंत्रणा ताब्यात घेतलाय आहेत. एकाच उद्योगपतीला जंगल दिले जात आहेत. प्रकल्प दिले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सत्तेतील पक्षांनी देखील विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही विरोधी पक्षात असाल त्यावेळी काय परिस्थिती असेल याचा विचार करायला हवा. राज्यातील एसआयआर रद्द झाला पाहिजे. त्यासोबतच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.