Raj-Uddhav Thackeray March : ठाकरे बंधूंचा मोर्चा अन् काँग्रेसच्या भूमिकेबाबत अफवा; अखेर दोन मोठे नेते सहभागी!

Vijay Wadettiwar Mumbai March : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.
Raj Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Uddhav Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

Thackeray Mumbai March : मुंबईत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा ‘गर्जना’ मोर्चा निघणार आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी हा मोर्चा आहे. या मोर्चाचे समन्वक राज ठाकरे असल्याने काँग्रेस नेते या मोर्चात सहभागी होणार नसल्याची चर्चा होती.

काँग्रेसने या मोर्चाला पाठींबा दिला होता. मात्र, काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्रात असल्याने बैठकीचे कारण देत नेते गैरहजर राहणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात हे या मोर्चात सहभागी होणार आहेत. ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल देखील झाले आहेत.

ठाकरे बंधू एकत्रितपणे मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. सुरुवातीचा मार्ग बदलून आता मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत. अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
SIR News : ठाकरे बंधूंचा निवडणूक आयोगाविरुद्ध महाएल्गार! थेट मुख्य निवडणूक आयुक्तांवर शिवतीर्थावरून ललकारणार

पक्षाचे झेंडे नाहीत...

या मोर्चासाठी गर्दी जमण्यास सुरुवात झाली असून सकाळपासून कार्यकर्ते आणि नागरिक मेट्रो सिनेमा परिसरात मोठे संख्येने येत होतो. पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा होत असून या मोर्चानंतर राज ठाकरे हे सोमवारी पुण्यात एमपीएससीचे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत.

Raj Thackeray | Uddhav Thackeray
Thackeray brothers Morcha : ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्याबाबत मोठी अपडेट, मार्ग बदलला! आता 'या' ठिकाणाहून होणार सुरुवात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com