

Mumbai News : उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीने मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. दोन दिवसापूर्वी ठरलेल्या मोर्चाच्या मार्गात आता बदल करण्यात आला आहे. याआधी नियोजित मार्गानुसार हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदाना असा जाणार होता. या मोर्चाची जय्यत तयारी सुरू असतानाच ठाकरे बंधूंच्या वतीने रविवारी काढण्यात येणाऱ्या या एल्गार मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
मुंबईत ठाकरे बंधूकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक येण्याची शक्यता आहे. या मोर्चासाठी मोठी तयारी सुरू असतानाच आता मोर्चाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आल्याचे समजते.
ठाकरे बंधूचा हा मोर्चा हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदाना असा जाणार होता. त्यामध्ये बदल करून मोर्चा हा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा जाणार आहे. या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मोर्चाचे अंतर थोडे कमी होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. या मोर्चाला राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत.
मोर्चाचे रूपांतर होणार सभेत
ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा निघणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होण्याची शक्यता आहे. दहा वाजता या मोर्चाला जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा आगेकूच करत मुंबई महापालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.
मुंबई महापालिकेसमोर सभेसाठी मंच उभारला जाणार आहे. ठाकरे बंधू गेल्या वर्षीपासून मराठीच्या मुद्दावर एकत्र आले आहेत. त्यानंतर या दोन नेत्यांमधील गाठीभेटी वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात कार्यक्रमाच्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.