raj thackeray  sarkarnama
महाराष्ट्र

Raj thackeray challenge : राज ठाकरेंचे ओपन चॅलेंज; म्हणाले,'...तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा...'

Elections in Maharashtra News : मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, व राजकीय पक्षाच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मनसेच्या मेळाव्यातून निवडणूक आयोगावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. या मेळाव्यावेळी राज ठाकरेंनी जोरदार टीका करताना निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिले आहे. मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, व राजकीय पक्षाच्या शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी घरोघरी जाऊन मतदार याद्या तपासण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार याद्या तपासण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

विधानसभेत 232 आमदार निवडून आले, पण महाराष्ट्रात सर्वत्र सन्नाटा होता. कुठे विजयी मिरवणुका नाहीत. जल्लोष नाही… काहीच नाही… तेव्हा मतदार तर अवाक् झालेच होते, तर जे निवडून आले ते देखील अवाक् झाले होते. त्यांना देखील कळलं नाही, ते कसे निवडून आले. त्यानंतर देशात कशा प्रकारच्या निवडणुका सुरु आहेत, याबद्दल सर्वांना कळलं. अनेक जण म्हणतात राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते, पण ते निवडून येत नाही… निवडणुका अशा होत असतील, तर कसं निवडून येणार असा प्रश्न देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रश्न उपस्थित केला.

यावेळीची निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा लागेल. ज्याप्रकारे मतदार यादीत गोंधळ सुरु आहे. हा आताचा गोंधळ नाही. हा गेल्या काही वर्षातील गोंधळ आहे. 2016, 2017 ला मी याविरुद्धच आवाज उठवला होता. त्यावेळी पत्रकार परिषदही झाली होती. त्यातील अनेकांना मी काय बोलतो याचं गांभीर्यच समजलं नाही. मग जेव्हा आता प्रत्येकाच्या दरवाज्यावर टक टक व्हायला लागली, तेव्हा निवडणुकीचे काय प्रकार सुरु आहे हे समजले असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT