Raj Thackeray On Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray On Ajit Pawar : 'लाडकी बहीण योजना' अन् राज ठाकरेंचा अजितदादा आणि सुप्रिया सुळेंना टोला

Raj Thackeray taunts Ajit Pawar and Supriya Sule over Ladki Bahin Yojana : राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना नाव न घेतला टोला लगावला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत,त्यांनी विधानसभा निवडणुकीला 'एकला चलो रे'ची भूमिका जाहीर केली.

Pradeep Pendhare

Mumbai News : परदेश दौरा, तेथील पर्यटन, उद्योग आणि पर्यावरणावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टोलेबाजी केली.

"राज्यातील मूळ प्रश्नांवर काम होत नाही. तसा कोणाकडेच वेळ नाही. वेळ देत नाहीत. आमच्याकडे काय चालू आहे म्हणे, लाडकी बहीण, लाडका भाऊ! लाडकी बहीण अन् लाडका भाऊ एकत्र राहिले असते, दोन्ही पक्ष टिकले असते, त्यासाठी योजना कशाला पाहिजे", असे म्हणत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव न राज ठाकरेंनी टोला लगावला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) राज्यातील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधला. राज ठाकरे यांनी परदेशातील पर्यटनाचा अनुभव सांगताना राज्यात काय परिस्थिती आहे, यावर भाष्य केले. राज्यातील मूळ प्रश्नांकडे कोणाचेच लक्ष नाही. मूळ प्रश्न घेऊन मनसेने विधानसभा निवडणुकीला समोरे जायचे आहे. यात कोणतीही तडजोड करू नका. राज्यात 200 ते 250 जागा लढवण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी केला. मला निष्ठावान कार्यकर्ते निवडणुकीत उतरावयाचे आहे. येथे पैसे कमवणारे नकोत, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांनी मिश्किल टोलेबाजी केली. या टोलेबाजीचा रोख अजित पवार (Ajit Pawar) आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे होता. अर्थात, राज ठाकरे यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हा टोला लगावताना दोघांचेही नाव घेतले नाही. मूळ प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आमच्याकडे लाडकी, बहीण लाडका भाऊ चालू आहे. लाडकी बहीण अन् लाडका भाऊ एकत्र राहिले असते, तर दोन्ही पक्ष टिकले असते, त्यासाठी योजना कशाला पाहिजे होती, असा टोला लगावताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. हशा पिकला. राज ठाकरे एवढं बोलून थांबले नाहीत, तर बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये देणार, असंच काही, तरी योजना आहे ती, असे विचारत राज्य सरकारकडे पैसे आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला.

अजेंडाऐवजी लक्ष विचलीत करण्यावर भर

"राज्यातील रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत. कुठेचे खड्डे बुजवणार आहे. आज महाराष्ट्रात पूर स्थिती आहे. मनसेच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि महाराष्ट्र सैनिकाला आवाहन करत पुरामध्ये अडकलेल्यांना मदत करा. पक्षाबरोबर वैयक्तिक जा, मदत करा. मूळ महाराष्ट्रातील प्रश्नाकडे लक्ष द्या. विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना हेच तुमचे अजेंडा असला पाहिजे. तुमचा प्रचार असला पाहिजे. नाहीतर आता एकमेकांवर शिव्या देत बसले आहेत. लोकांचे लक्ष विचलित कराचे. लक्ष भरकटवायचे. हाताला काहीच लागणार नाही", असा देखील टोला राज ठाकरे यांनी लगावला.

कोण कोठे कळतच नाही

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी पक्षांच्या राजकीय वाटचालीवर मोठं भाष्य केले. "कोण कोठे गेला आहे, कोण कोठे आहे, काहीच समजत नाही. विचारावे लागते. काहीच कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान होणार आहे. न भूतो असे असेल", असे भाकीत राज ठाकरे यांनी वर्तवले.

मी कार्पेट टाकून देतो

मनसेमधून काही पक्षांतराच्या तयारीत आहेत, त्यावर राज ठाकरे यांनी म्हणाले, "मी लाल कार्पेट टाकेल. जा म्हणून. जो भविष्याचा सत्यानाश करून घ्याल. त्यांचेच स्थिर नाही. तुम्हाला कोठे डोक्यावर घेतील:. गेल्या लोकसभेला काय झाले पाहिले ना, वर्षापर्यंत घुसले. आता विधानसभेला कोठे-कोठे घुसतील माहीत नाही, असे सांगून पक्षांतर करणाऱ्यांना राज ठाकरेंनी सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT