Nitin Gadkari News : मंत्री नितीन गडकरींचं दबावतंत्र, महापालिकेतच जनता दरबार; आयुक्त म्हणतात...

Vidarbha Politics : भाजप नेते नितीन गडकरी हे दर महिन्याला खामला चौकातील आपल्या कार्यालयात जनता दरबार घेतात. नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकूण घेतात. यावेळी त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्यालयातच...
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी नागपूर महापालिकेच्या मुख्यालयात जनता दरबार घेणार असल्याने शहरात आधीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. महापालिकेचे अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडले आहेत.

यावर महापालिका आयुक्त अभिजित चौधरी म्हणतात, तो त्यांचा निर्णय आहे, मी बोलणे योग्य नाही, त्यामुळे या दरबारात नेमके काय होणार याची उत्सुकता वाढली आहे.

भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे दर महिन्याला खामला चौकातील आपल्या कार्यालयात जनता दरबार घेतात. नागरिकांच्या तक्रारी व समस्या ऐकूण घेतात. यावेळी त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्यालयातच जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली आहे.

या दरबारात महापालिकेचे अधिकारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. गडकरींचा स्वभाव थेट फैलावर घेणारा असल्याने अधिकारी त्यांच्यापासून वचकून असतात. त्यामुळे सर्वचजण धास्तीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या अतिवृष्टीने घराघरांमध्ये पाणी शिरले होते. मागील पावसाळ्यात मोठा फटका शहराला बसला होता. हे बघून महापालिकेने हिवाळ्यापासूनच पावसाळी तयारी सुरू केली होती. असे असतानाही रस्ते तुडुंब भरले होते. अनेक घरांमध्ये पाणी घुसले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नागपूर महापालिका आयुक्तांनी नाल्यांची साफसफाई योग्य झाली नाही, खासकरून पावसाळी नाल्यांमधून पाण्याचा निचरा बरोबर झाला नसल्याचे कबूल केले आहे. दुसरीकडे सिमेंटरोडची उंचीने घरे खाली गेली, काँक्रिटीकरण करताना पावसाळी नाल्यांचे बांधकाम योग्य झाले नसल्याने शहरात पावसाचे पाणी शिरण्याची समस्या निर्माण झाली आहे.

शहरातील 70 टक्के रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर महापालिकेने सिमेंट रोडचा टप्पा चारची सुरुवात करताना कंत्राटदारांना खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे. आधीच्या सिमेंट रोडच्या उंचीमुळे उद्‍भवलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नीरीच्या एका तज्ञाची महापालिकेने नियुक्ती केली आहे. गरज भासल्यास काही सिमेंट फोडण्यात येणार आहे.

यावरून पुढारी आणि अधिकारी यांच्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा आग्रह गडकरी यांचा आहे. हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सिमेंट रोडमुळे घराघरांमध्ये पावसाचे पाणी शिरते ते त्यांना मान्यच नाही. हे आरोप त्यांनी यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

नागपूर महापालिकेत अडीच वर्षांपासून प्रशासक आहेत. महापालिकेच्या कारभारावर माजी नगरसेवक नाराज आहेत. अधिकारी ऐकत नसल्याच्या त्यांच्या तक्रारी आहेत. भाजपच्या (BJP) एका आमदाराने विधान परिषदेत आयुक्त महाराजांसारखे वागतात असा आरोप केला होता. याबबात आयुक्तांना विचारणा केली असता त्यांनी अधिकारी कामे करीत नाही असे काही नाही.

माझ्याकडे आलेल्या सर्वांची कामे केली आहे. निधीचा प्रश्न असतो तेव्हा स्पष्ट माहिती दिली जाते. नितीन गडकरी केंद्रीयमंत्री आहेत. शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी कुठे जनता दरबार घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. यावर आपण बोलणे योग्य नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari
Abdul Sattar News : मुख्यमंत्री शिंदेंकडून सत्तारांवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी; भुमरेंचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com