Eknath shinde, Raj Thackeray And Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Thane municipal election: ठाण्यात शिंदेंना घेरण्यासाठी दोन्ही ठाकरेंची 'वज्रमूठ'! महागर्जनेची तारीख ठरली

Political News : एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील प्रचार सभेसाठी राज-उद्धव ठाकरे यांनी मोठे प्लॅनिंग केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Thane News : राज्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. शेवटचे चारच दिवस शिल्लक असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका व आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील प्रचार सभेसाठी राज-उद्धव ठाकरे यांनी मोठे प्लॅनिंग केले आहे.

शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या बुरुजाला सुरूंग लावण्यासाठी रणनीती आखली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही याच उद्देशाने ठाण्यामध्ये येणार असून या दोघांची तिसरी जाहीर आणि संयुक्त सभा 12 जानेवारीला ठाण्यात होणार आहे.

ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 जागा आहेत. यापैकी 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधकांनी या जागांवर उमेदवार न दिल्याने किंवा अर्ज बाद झाल्याने शिवसेनेचे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाण्यामध्ये शिवसेनेने 87 जागांवर तर भाजपने 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर त्यांच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र लढत आहेत.

त्यातच आता प्रचारसाठी काही दिवसाचा अवधी शिल्लक असल्याने शिवसेना आणि मनसेने 12 जानेवारीला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेसाठीची वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. "मुक्काम पोस्ट ठाणे, मराठी जनांना आग्रहाचे निमंत्रण" असे सभेसाठीच्या निमंत्रणावर लिहिण्यात आले आहे. या निमंत्रणावर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला असून दोन्ही सेनांची चिन्हे आहेत. संध्याकाळी 5 वाजता गडकरी रंगायतनसमोर ही सभा होणार आहे.

ठाणे हा एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला होता. याठिकाणी 25 वर्षापेक्षा अधिककाळ शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर याठिकाणचे बरेचसे नेतेमंडळी एकनाथ शिंदे यांच्यासॊबत गेले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणती शिवसेना बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये शुक्रवारी झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे शनिवारी उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे तर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दोघांची संयुक्त सभा होणार आहे. तर त्यानंतर सोमवारी १२ जानेवारीला ठाण्यात सभा होणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT