Uddhav Thackeray Nashik : देवयानी फरांदे रडल्या, त्यांना रडू आवरेना.. उद्धव ठाकरेंनी जागवल्या कटू आठवणी

Uddhav Thackeray On Devyani Pharande : आमदार देवयानी फरांदे यांचा उल्लेख करुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. भाजपने आयारामांना पक्षात घेऊन तिकीटं दिली त्यावरुनही टीका केली.
Devyani Pharande, Uddhav Thackeray
Devyani Pharande, Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर तब्बल २३ वर्षांनी एकत्र आलेल्या शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही बंधूंची संयुक्त सभा काल (दि. १०) नाशिकमध्ये पार पडली. या सभेतून दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसह आमदारांनाही चुचकारल्याचे पाहायला मिळाले.

उद्धवसेनेतील दोन माजी महापौरांना भाजपने आमदार देवयानी फरांदे यांचा विरोध झुगारुन पक्षात घेतल्यानंतर देवयानी फरांदे रडल्या. त्यांना रडू आवरेना.. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सहानुभूती व्यक्त केली. त्यांनी आपण टोमना मारत नसल्याचे सांगितले. त्या निष्ठावंत आहेत आणि पक्षातील निष्ठावंतांसाठी भांडल्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, कॉंग्रेसचे शाहू खैरे या सर्वांच्या भाजप प्रवेशाला देवयानी फरांदे यांनी विरोध केला होता. पण फरांदे यांचा विरोध झुगारुन मंत्री गिरीश महाजन यांनी या सगळ्यांना पक्षात प्रवेश दिला शिवाय या सगळ्यांच्या कुटुंबात उमेदवारीही दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय नको या भावनेतून त्यावेळी आमदार फरांदे यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

Devyani Pharande, Uddhav Thackeray
Raj Thackeray : 'महाजनांपेक्षा लाकूडतोड्या बरा, हे झाडांआधी कार्यकर्ते छाटतात अन् बाहेरून मागवलेली झाडे...'; तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी भाजपला घेरलं

निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार फरांदे हे सगळं विसरुन निवडणूक प्रमुख या नात्याने प्रचाराला लागल्या होत्या. पण उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये येत या माध्यमातून त्यांच्या कटू आठवणी जागवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. फरांदे यांचे उदाहरण देत उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकप्रकारे घाव केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मला आज भाजपच्या निष्ठावान कार्यकत्यांचे वाईट वाटत आहे. देवयानीताई यांच्याबाबत मला आदर आहे. त्यांना रडू आवरेना. देवयानी ताई म्हणाल्या, दलालांनी ब्रीफिंग केले म्हणे. म्हणजे भाजपमध्ये दलाल आहेत. तुमची निष्ठा ज्या पक्षाशी आहे, तो पक्ष आज उपऱ्यांचा, दलालांचा झाला आहे. आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. तुम्हाला पक्ष वाढवायला कुत्ता चालतो, बिल्ली चालते, चुहा चालतो, अशी बरबटलेली माणसे पक्षात घ्यायची आणि त्यांची लंगोट साफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचे, हे निष्ठावंत भाजपवाल्यांच्या नशिबी आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

Devyani Pharande, Uddhav Thackeray
Raj Thackeray: 1952 मध्ये जन्माला आलेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लगतात! निष्ठावंतांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी भाजपला डिवचलं

शनिशिंगणापूर आणि भाजपला दरवाजे नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले. भाजपमध्ये चोर दरोडेखोर येतात. रावणालासुद्धा भाजपमध्ये घेतील, एवढे निर्लज्ज झालेत, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी भाजपवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com