BJP News : भाजपने नगरसेवक बनवलेला नेता निघाला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी : बदलापूरमध्ये धक्कादायक, संतापजनक प्रकार

Nominated Corporator Tushar Apte : विधानसभा निवडणुकीपूर्वी बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. तर, शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
Protests erupt in Badlapur after BJP nominates sexual assault accused Tushar Apte as corporator.
Protests erupt in Badlapur after BJP nominates sexual assault accused Tushar Apte as corporator.sarkarnama
Published on
Updated on

Badlapur News : बदलापूरातील खासगी शाळेतील दोन चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्यासह देश हादरला होता. या घटनेनंतर बदलापूरमध्ये उसळलेले तीव्र आणि काही ठिकाणी हिंसक आंदोलन झाली होती. या प्रकरणांतील त्या शाळेचे तत्कालीन सचिव तुषार आपटे यांच्यावर विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे या पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

काही काळ ते कारागृहात होते. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. आता याच तुषार आपटे यांना भाजपकडून बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आले आहे. त्यामुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीला नगरसेवकपद कशाच्या आधारावर देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत भाजपचे नेते राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले, की तुषार आपटे यांनी नगरसेवकपदासाठी थेट उमेदवारी मागितली होती, मात्र ती दिली नाही. निवडणूक काळात आपटे यांनी पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपचे चार उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

Protests erupt in Badlapur after BJP nominates sexual assault accused Tushar Apte as corporator.
Amol Balwadkar vs Lahu Balwadkar : बालवडकर विरुद्ध बालवडकर, प्रभाग 9 मध्ये हाय-व्होल्टेज लढत, चंद्रकांतदादा म्हणाले, ‘डायरीत लिहून ठेवा...’

प्रकरण न्यायप्रविष्ट

बदलापूर आदर्श शाळेतील संबंधित प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अद्याप निकाल लागलेला नाही. न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष मानली जाते, असे देखील त्यांनी सांगितले.

Protests erupt in Badlapur after BJP nominates sexual assault accused Tushar Apte as corporator.
Pune Election: संक्रांतीच्या नावाखाली मतांच्या खरेदीचा बाजार; प्रशासनानं झाकून घेतले डोळे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com