Ekanath Khadse, Raksha Khdse  Sarkarnama
महाराष्ट्र

Raksha Khadse News : दोन दिवसांतच रक्षा खडसेंचा 'त्या' विधानावरून यूटर्न; आता म्हणाल्या,'एकनाथ खडसेंना...'

Sachin Waghmare

Bjp News : भाजपमधून बाहेर पडलेले नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. त्यावर भाजप खासदार रक्षा खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत इतर पक्षातील नेते भाजपमध्ये येत आहेत. त्याप्रमाणे नाथाभाऊ भाजपमध्ये आले तर आम्हाला आनंदच आहे. आधीही नाथाभाऊ हे भाजपचे नेतेच होते. ते आल्याने आनंद होईल आणि कोणीही भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच केले जाईल, असे विधान त्यांनी केले होते.

दोन दिवसांनंतरच खासदार रक्षा खडसे यांनी या विधानावरून घूमजाव केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये यावे असे आवाहन केले नाही, असे रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आपल्याच विधानावरून घूमजाव केला आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याबाबत जी कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असे वक्तव्य रक्षा खडसे यांनी केले आहे. (Ekanath Khadse News)

खासदार रक्षा खडसे यांनी या विधानावरून यूटर्न का घेतला, याच नेमके कारण समजत नाही. त्यांनी याचे खापर मीडियावर फोडले आहे. त्यांनी भाजपमध्ये यावे, असे आवाहन केलेले नाही. मला सरळ पत्रकारांनी विचारले नाथाभाऊ आल्यावर, तुमची प्रतिक्रिया काय ? नाथाभाऊ पक्षात आले तर जी कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया असेल, तीच माझी प्रतिक्रिया असेल, असे उत्तर दिले आहे. मी त्यांना आवाहन वगैरे काहीही केलेले नाही’, अशा शब्दांत रक्षा खडसे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये परत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दर्शवला आहे.

त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेतृत्व मान्य केले आहे, त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ही ऑफर नाकारली आहे. त्यामुळेच रक्षा खडसे यांनीदेखील तसे विधान केले नसल्याचे सांगत सपशेल यूटर्न घेतला आहे.

R

SCROLL FOR NEXT