Eknath Khadse News : सूनबाईच्या हाकेला नाथाभाऊ साद घालणार का ?

Political News : राज्यातील सगळ्या फाटाफुटींनंतर आता भाजपपासून दूर गेलेल्या नेतेमंडळींना ऑफर दिली जात असल्याची चर्चा जोर धरत आहे.
Ekanath Khadse, Raksha Khdse
Ekanath Khadse, Raksha Khdse Srkarnama
Published on
Updated on

Bjp News : गेल्या दोन वर्षातील फोडाफोडीमुळे राज्यातील राजकारणाचा कूस बदलला आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील ४० आमदार फोडत शिवसेना-भाजपला जवळ केले. त्यानंतर काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सगळ्या फाटाफुटींनंतर आता भाजपपासून दूर गेलेल्या नेतेमंडळींना ऑफर दिली जात असल्याची चर्चा जॊरात आहे.

भाजपमध्ये येत्या काळात राज्यातील अनेक मोठे नेते प्रवेश करणार असून त्यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील भाजपमध्ये यावे, ही आपली व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सुनबाई तथा खासदार रक्षा खडसे यांनी बोलून दाखवली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पुन्हा नाथाभाऊ भाजप प्रवेश करणार का ? अशा चर्चा या निम्मिताने सोशल मीडियात जोरात रंगल्या आहेत. काही जणांनी सुनबाईनी भावनिक आवाहन केल्याने नाथाभाऊ ऐकतील अशास्वरूपाच्या वावड्या उठवल्या होत्या. ( Jalgaon Political News )

Ekanath Khadse, Raksha Khdse
Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी केलेले 'ते' विधान पुन्हा चर्चेत

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या मागे गेल्या काही दिवसापासून लागलेले ईडीचे शुक्लकाष्ट संपेल अशी आशा होती. मात्र, खडसेंच्या निकटवर्तीयांच्या मते येत्या काळात त्यांनी जर उलट या भीतीपोटी त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांच्या मागे लावण्यात आलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा कमी होण्याऐवजी वाढ होईल.

भाजपमध्ये त्यांचे काही हितचिंतक असून उलट त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. ईडीचा व इतर तपास यंत्रणेचा वापर त्यांच्या विरोधात भाजप सोडण्यापूर्वीपासून केला जात होता. त्यामुळेच भाजप सोडण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला होता. त्यामुळे ते भविष्यात भाजपमध्ये जाण्याचा विचार करतील, असे वाटत नाही.

एकनाथ खडसे यांनी भाजप संघटना राज्यभर पोचविण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत ते राज्यभर फिरले. पक्ष वाढीसाठी खूप मोठा संघर्ष केला. भाजपच्या पडत्या काळात त्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांना भाजपकडून काही अपेक्षा होत्या. गेली दहा वर्ष केंद्रात व राज्यात भाजपची सतत असताना त्यांना तपास यंत्रणेमुळेच मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. हा सर्व इतिहास ते विसरले नाहीत. त्याची सल नेहमीच त्यांना बोचतही असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये परत यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायचा नसल्याचे स्पष्ट करीत नकार दर्शवला आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नेतृत्व मान्य केले आहे, त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी ही ऑफर नाकारली असल्याचे समजते.

ईडी, सीबीआय यातून सुटका मिळण्यासाठी एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपमध्ये (Bjp) गेल्यानंतर ईडीसीबीआय यातून सुटका मिळाली असती तर यापूर्वीच भाजपमध्ये गेलो असतो. त्यासाठी संघर्ष केला नसता. त्यासोबतच त्यांना अजित पवार ज्यावेळी वेगळे झाले. त्यावेळी त्यांना अजित पवार यांच्यासॊबत जाता आले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे येत्या काळात एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता खूपच कमी आहे

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com