Thane Politics : गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेले राम गणेश गडकरी रंगायतन अखेर सुरु झाले आहे. महापालिकेकडून या रंगायतनचे नूतनीकरण करण्यात आले असून नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळाही नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यानंतर नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांचाच धडाका सुरु आहे. त्यामुळे कलाकारांसह नाट्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. यावरूनच नाट्यगृह नाटकांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी की राजकीय कार्यक्रमांसाठी सुरू केले? असा सवाल विचारला जात आहे.
या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने मंगळागौरचा आयोजित केला होता. त्यावेळी शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा केली. त्यानंतर 21 तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते, परंतु ऐनवेळेस हा कार्यक्रम रद्द झाला. अशातच गणेश नाईक यांचा जनता दरबार हा डॉ. काशिनाथ घाणेकर या नाट्यगृहात आयोजित केला होता, मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापल्याने आणि शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्यात हेरण्यासाठी नाईकांचा जनता दरबार 22 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे झाला.
23 तारखेला याच रंगायतनमध्ये भाजप नेते संजय वाघुले यांच्या संस्थेच्या विश्वास सामाजिक माध्यमातून मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी महापालिकेच्या वतीने या ठिकाणी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याच दिवशी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेदेखील एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, अशी माहिती गडकरी रंगायतन व्यवस्थापनाने दिली.
भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी :
गडकरी रंगायतनच्या नूतनीकरण सोहळ्यात दाखवलेल्या चित्रफितीवरून भाजप आमदार संजय केळकर यांनी नाव न घेता शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसंच प्रशासनावरही टीका केली. ‘आमच्या येथे एक रिमोट कंट्रोल आहे. ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे आयोजन होते. त्यामुळे त्या चित्रफितीतील अभिनय मला तोंडाने सांगण्याची गरज नाही,’ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
सध्या पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी प्रशासन कोणाच्या ना कोणाच्या अधीन गेलेले दिसते, अशी टोलाही केळकर यांनी लगावला. मला अनेक लोकांचे फोन आले. या नाट्य क्षेत्रातल्या अनेक लोकांनी विचारले. हे काही आजचे नाही, नेहमीचेच आहे. ठाणेकरांना बरोबर माहिती आहे. ते योग्य वेळेला उत्तर देतील, अशी टीका आमदार केळकर यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.