Thane Politics : 'शिवसेना कोणाची वाट बघत बसणार नाही;' भाजप, राष्ट्रवादीला तगडा 'मेसेज' देत एकनाथ शिंदे एकटेच धावले!

Thane Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील 'वर्षा मॅरेथॉनमध्ये' भाग घेतला. या मॅरेथॉनला भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही गैरहजर राहिले.
Varsha Marathon Led by Eknath Shinde
Varsha Marathon Led by Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Politics : 'आगामी काळात जे येतील त्यांच्यासोबत अन्यथा त्यांच्याशिवाय...' असाच कडक संदेश देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील 'वर्षा मॅरेथॉनमध्ये' भाग घेतला. कोरोनानंतर 5 वर्षांनी ठाण्यात महापालिकेने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली. मात्र या मॅरेथॉनवर सर्वत्र शिवसेनेचीच छाप पाहायला मिळाली. या मॅरेथॉनवर विरोधकांचा बहिष्कार सहाजिक होता. पण भाजप आणि राष्ट्रवादीचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारीही गैरहजर राहिले. पण त्यांची वाट न बघता शिवसेनेने ही मॅरेथॉन यशस्वी करून दाखवली.

दिवंगत सतीश प्रधान महापौर असताना त्यांच्या संकल्पनेतून वर्षा मॅरेथॉन सुरु झाली होती. मागील 30 वर्षांपासून या मॅरेथॉनचे महापौरांच्या हस्ते आयोजन केले जात होते. पण सध्या महापालिकेवर प्रशासक राज आहे, शिवाय कोरोनानंतर या स्पर्धेला मुहूर्त मिळाला नव्हता. पण आगामी ठाणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यावर्षी प्रशासकांनी वर्षा मॅरेथॉनचा घाट घातला. त्यासाठी निधी उभारताना महापालिकेची चांगलीच दमछाक झाली. पण अखेर 10 ऑगस्टला पावसाच्या गैरहजेरीतच वर्षा मॅरेथॉन पारही पडली.

या मॅरेथॉनच्या उद्घाटनाला मंत्री गणेश नाईक, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीब मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतरही सर्व माजी नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले होते. शहरात झळकलेल्या फलकांवर निमंत्रितांचे फोटोही लावण्यात आले होते. पण प्रत्यक्षात व्यासपीठावर फक्त शिवसेनेच्याच लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, सचिव राम रेपाळे यांच्यासह पक्षातील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेच्या पूर्ण धावपट्टीच्या ठिकाणीही शिवसेनेचे झेंडे लागले होते. काही वेळासाठी हा उपक्रम ठाणे महापालिकेचा आहे की शिवसेनेचा आहे? असा संभ्रम तयार झाला होता. याबाबत मित्रपक्षांतील काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी 'सकाळ'कडे नाराजी व्यक्त केली.

भाजपमध्ये नाराजी :

ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी सांगत तरी भाजपला स्वतंत्र निवडणूक लढायची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रम किंवा उपक्रमांना स्थानिक पदाधिकारी जाणे टाळत आहेत. याला वर्षा मॅरेथॉनही अपवाद राहिली नाही.

आमदार संजय केळकर बाहेरगावी आहेत. पण आमदार निरंजन डावखरे, भाजपचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवकही मॅरेथॉनपासून चार हात लांब राहिले. जितेंद्र आव्हाड यांनीही गैरहजेरी लावली, पण सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नजिब मुल्ला यांनीही पाठ फिरवल्याने चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com